AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan : ज्याची भिती तेच घडणार… जगाला हादरवणारी घोषणा, अखेर महायुद्ध होणार, पाकिस्तानची खुमखुमी

Afghanistan-Pakistan Conflict : फेब्रुवारी पासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमा तणावात तीव्र वाढ झल्याचे दिसत आहे. आता दोन्ही बाजूंनी हल्ले होत आहेत, ज्यामुळे जीवितहानी आणि तळांचे अतोनात नुकसान होत आहे.

Pakistan : ज्याची भिती तेच घडणार… जगाला हादरवणारी घोषणा, अखेर महायुद्ध होणार, पाकिस्तानची खुमखुमी
| Updated on: Feb 27, 2026 | 8:21 AM
Share

शुक्रवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि दक्षिणेकडील कंदहार शहरासह अनेक भागात हवाई हल्ले केल्याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव वाढला. अफगाण सैन्याने अलिकडच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी सीमा चौक्यांवर हल्ला केला होता असा दावा तालिबान सरकारने केला त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यानंतर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाण तालिबानविरुद्ध ‘खुले युद्ध’ घोषित केलं.

काबूल, पक्तिया प्रांत आणि कंधारमध्ये “अफगाण तालिबानच्या संरक्षण स्थानांना” लक्ष्य करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्तुल्लाह तरार यांनी सोशल मीडियावर दिली होती. तर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी काबूलविरुद्ध “खुले युद्ध” घोषित केले, एवढंच नव्हे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी “तालिबानच्या उघड आक्रमणाला योग्य प्रत्युत्तर” असंही म्हटलं.

काबूलमध्ये जवळपास 2 तास लढाऊ विमानांचे आवाज, जोरदार धमाके आणि गोळ्यांचा खडखडाट ऐकायला येत होता. तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्लाह अखुंदजादा याचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कंधारमध्येस, पत्रकारांनीही जेट विमानांचा आवाज ऐकल्याची पुष्टी केली.

पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर तालिबानचे प्रत्युत्तर

तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानी हवाई हल्ल्यांना दुजोरा दिला, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही असे सांगितले. मात्र त्यांनी यापूर्वीच सीमेवर “मोठ्या प्रमाणात प्रति-हल्ला” सुरू करण्याची घोषणा केली होती. जमिनीवरील चकमकीत त्यांचे आठ सैनिक मारले गेले असे अफगाण संरक्षण मंत्रालयाने सांगितलं होतं.

133 अफगाणी सैनिक मारल्याचा पाकचा दावा

पाकिस्तानी हल्ल्यात 133 अफगाण सैनिक मारले गेले आणि 200 हून अधिक सैनिक जखमी झाले असं पाकिस्तानी मंत्री अताउल्लाह तरार यांनी X वर ट्विट केलं होतं. पाकिस्तानी सैन्याने 27 अफगाण चौक्या उद्ध्वस्त केल्या आणि अजूनही नऊ पाकिस्तानचा कब्जा आहे. पाकिस्तान सरकारने असाही दावा केला आहे की त्यांनी 80 हून अधिक अफगाण टँक, तोफखाना आणि इतर उपकरणे नष्ट केली. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर, अफगाणिस्तानने सकाळी 5:30 वाजता स्पिन बोल्दाक-चमन सीमेवर आणि हेलमंड-बारमचा सीमेवर पाकिस्तानवर आणखी एक हल्ला केला. अफगाणिस्तान आता सीमेवरील आठ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढत आहे.

Follow Us
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार