Lasalgaon Murder : संपत्तीच्या वादातून माथेफिरुकडून आईवडिलांना मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दाम्पत्याचा मृत्यू

| Updated on: Jun 21, 2022 | 5:56 PM

नेहमीप्रमाणे आज सकाळीही आई-वडील आणि मुलगा यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, माथेफिरू मुलगा दत्तात्रेयने लोखंडी पाईपने आई सरूबाई आणि वडील रामदास यांना मारहाण केली. मात्र आरडाओरड झाल्यामुळे शेजारील वस्तीवरील लोक धावत आले. या मारहाणीत डोक्याला गंभीर जखम झाल्याने तातडीने दोघांना निफाड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

Lasalgaon Murder : संपत्तीच्या वादातून माथेफिरुकडून आईवडिलांना मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दाम्पत्याचा मृत्यू
संपत्तीच्या वादातून माथेफिरुकडून आईवडिलांना मारहाण
Image Credit source: TV9
Follow us on

लासलगाव : संपत्तीच्या वादातून एका माथेफिरु मुला (Son)ने आपल्या वृद्ध आईवडिलांना बेदम मारहाण (Beating) केली. या मारहाणीत आई-वडिलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे घडली आहे. रामदास अण्णाजी सुडके आणि सरूबाई रामदास सुडके अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी माथेफिरू मुलगा दत्तात्रेय हा शेतीच्या कडेने पळून जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करत या माथेफिरूला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता प्रॉपर्टीच्या व्यवहाराच्या भांडणातून मारहाण केल्याची कबुली त्याने दिली.

संपत्तीच्या वादातून मुलगा नेहमीच आई-वडिलांशी भांडण करायचा

खडक माळेगाव येथील सुडके वस्तीवर रामदास अण्णाजी सुडके हे आपली पत्नी सरूबाई, मुलगा दत्तात्रय व नात यांच्यासह राहतात. घरातील आणि शेतीचे संपूर्ण व्यवहार आई सरूबाई हिच्या हातात असल्याने नेहमीच आई आणी मुलात वाद होत होते. नेहमीप्रमाणे आज सकाळीही आई-वडील आणि मुलगा यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, माथेफिरू मुलगा दत्तात्रेयने लोखंडी पाईपने आई सरूबाई आणि वडील रामदास यांना मारहाण केली. मात्र आरडाओरड झाल्यामुळे शेजारील वस्तीवरील लोक धावत आले. या मारहाणीत डोक्याला गंभीर जखम झाल्याने तातडीने दोघांना निफाड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले. या गुन्ह्यातील आरोपी दत्तात्रेय याची दोन लग्न झाली आहेत. मात्र दुसऱ्या पत्नीसोबत नेहमीच वाद होत असल्याने पत्नी गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या 4 वर्षाच्या मुलीला सोडून माहेरी राहत आहे.

याप्रकरणी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, निफाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ तपास करत आहे. यात पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठले, पो.कॉ. योगेश शिंदे, प्रदीप अजगे, कैलास महाजन, मारुती सुरासे, सागर आरोटे, सुजय बारगळ, देवीदास पानसरे यांनी सहकार्य केले. (Couple dies after being seriously injured in a property dispute in Lasalgaon)

हे सुद्धा वाचा