हिंगोलीत फटाक्यांच्या साठ्याला भीषण आग; ३ जणांचा मृत्यू, १५ ते १६ जण गंभीर जखमी, अग्निशमन दलाची गाडी जळून खाक
Hingoli Fire News: हिंगोलीत फटाक्यांच्या आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी आहेत.

हिंगोलीतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. हिंगोलीत आगीची घटना घडली आहे. फटाके व्यापाऱ्याच्या घरी ठेवलेल्या फटाक्याला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ ते १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील कपडा गल्लीतील गोपाल बासटवार यांच्या घरात असलेल्या फटाक्याला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत 15 ते 16 जण जखमी झाले आहेत. तर या घटनेत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कपडा मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये अग्निशमन दलाची गाडी जळून खाक झाली आहे. तर अग्निशमन दलाच्या कर्मचारी भाजला आहे.
या घटनेत बचावकार्य करत असताना अग्निशमन दलाचा कर्मचारीही भाजल्याचे दिसून आले आहे. त्यांना उपचारासाठी लातूर येथे रवाना करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग आटोक्यात झाली असली तरी परिस्थिती गंभीर आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची आमदार बांगर यांनी भीती व्यक्त केली आहे. ओट्यावर पडलेले दोन मृतदेह आम्ही उचलले, अशी आमदार संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या आगीमध्ये भाजलेल्या रुग्णांवर शहरातील लक्ष्मी लाइफ केअर मध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेत ३ मृत्यू तर दोघांची परिस्थिती गंभीर आहे. अशी लक्ष्मी लाइफकेअरचे संचालक डॉक्टर अखिल अग्रवाल यांनी माहिती दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. प्रशासन या घटनेवर लक्ष ठेवून असल्याचे तेथील लोक प्रतिनिधींनी सांगितले आहे. तसेच जखमींवरही लक्ष ठेवून आहेत. या घटनेमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.