नाशिकमधल्या प्रख्यात अशोका बिल्डरची फसवणूक; माजी संचालकाने घातला गंडा, गुन्हा दाखल

नाशिकमधल्या प्रख्यात अशोका बिल्डरची माजी संचालकाने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दीपक मानकलाल कटारियाविरुद्ध गौतम कांतीलाल हिरण यांनी दिलेल्या फर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमधल्या प्रख्यात अशोका बिल्डरची फसवणूक; माजी संचालकाने घातला गंडा, गुन्हा दाखल
प्रातिनिधीक फोटो

नाशिकः नाशिकमधल्या प्रख्यात अशोका बिल्डरची माजी संचालकाने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दीपक मानकलाल कटारियाविरुद्ध गौतम कांतीलाल हिरण यांनी दिलेल्या फर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud of renowned Ashoka Builder in Nashik; Filed a crime against the former director)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमधील प्रख्यात अशोका बिल्डर यांची अशोका बिल्डकॉन अॅण्ड डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे. या कंपनीत दीपक कटारिया हा 1995 पर्यंत संचालक पदावर होता. मात्र, कटारियाला 15 मार्च 1995 मध्ये संचालक पदावरून काढण्यात आले. त्याबाबतचा 32 क्रमांकाचा नमुना अर्ज रजिस्ट्रार कार्यालयाला सादर करण्यात आला. मात्र, कटारियाने संचालक पदावर नसताना 1998 मध्ये कंपनीचे काही व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. गंगापूर रोडवरील अशोका प्रेसिडेन्सी या मालमत्तेच्या मूळ मालक विमला पंडित यांनी 1998 मध्ये अशोक मोतीलाल कटारिया यांच्या नावे मालमत्तेचे मुख्यतार पत्र सब रजिस्ट्रार कार्यालयात येऊन नोंदणी करून दिले. त्यांचे 2001 साली निधन झाले. त्यानंतर अशोक कटारिया यांच्या लाभांत त्यांच्या वारसदारांनी 2006 साली नोंदणीकृत पुरवणी आम मुखत्यारपत्र लिहून दिले व नोंदवले. मात्र, त्यावेळी दीपक याचे संचालक पद नव्हते. सोबतच आम मुखत्यारपत्र रद्द झाले होते. त्यामुळे त्याला अशोका बाबतचा कसलाही व्यवहार करण्याचा अधिकार नव्हता. तरीही त्याने सदनिकांची खरेदी, विक्री, गहाण ठेवणे हे प्रकार केले. सोबतच अशोका प्रेसिडेन्सीमधील गाळे, दुकाने यांची खरेदी विक्री केली. भाडेतत्त्वाचा करारनामा केला. त्यामुळे दीपक कटारियाविरुद्ध गौतम कांतीलाल हिरण यांनी दिलेल्या फर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास गंगापूर पोलिस करत आहेत.

‘अशोका’ बडे प्रस्थ

नाशिकमध्ये ‘अशोका’ हे बडे प्रस्थ आहे. त्यांची अशोका बिल्डकॉन अॅण्ड डेव्हलपर्स नावाची कंपनी बांधकाम व्यवसायात कार्यरत आहे. सोबतच त्यांची शाळा, कॉलेज, हॉटेल आहेत. त्यांचे अशोका मार्ग परिसरात एक मोठे कार्यालय आहे. विशेषतः भाजीपाला खरेदी-विक्री, चाट भांडार, मिठाई ते अनेक व्यवसायात त्यांची गुंतवणूक आहे. आता त्यांच्या कार्यालयातील फसवणूक प्रकरण बाहेर आले आहे. त्याची नाशिक शहरात मोठी चर्चा आहे. (Fraud of renowned Ashoka Builder in Nashik; Filed a crime against the former director)

इतर बातम्याः

चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर दोघांचा बलात्कार; नाशिकजवळची औंढेवाडी हादरली, एक आरोपी अल्पवयीन

द्राक्ष बागायतदारांना धाकधूक; 15 दिवस बेमोसमी पाऊस नको, अन्यथा तोंडाशी आलेला घास हिरावणार!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI