नाशिकमधील भाजप नगरसेवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक, राजकीय द्वेषातून हॅकिंगचा आरोप

| Updated on: Aug 20, 2021 | 8:18 AM

मुकेश शहाणे हे नाशिक महापालिकेतील प्रभाग क्रमांक 29 चे नगरसेवक आहेत. कोणीही पैशांची मागणी किंवा फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली, तर स्वीकारु नये, असे आवाहन शहाणे यांनी केले आहे.

नाशिकमधील भाजप नगरसेवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक, राजकीय द्वेषातून हॅकिंगचा आरोप
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नाशिक : नाशिकमधील भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं समोर आलं आहे. अकाऊण्ट हॅक करुन फेसबुक मित्रांकडे पैशाची मागणी केल्याचं समोर आलं आहे. नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्यात सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राजकीय द्वेषातून हॅकिंगचा आरोप

राजकीय द्वेषापोटी मला बदनाम करण्याच्या हेतूने फेसबुक अकाउंट हॅक केल्याचा आरोप भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केला आहे. मुकेश शहाणे हे नाशिक महापालिकेतील प्रभाग क्रमांक 29 चे नगरसेवक आहेत. कोणीही पैशांची मागणी किंवा फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली, तर स्वीकारु नये, असे आवाहन शहाणे यांनी केले आहे.

पोलीस महासंचालकांचे बनावट फेसबुक खाते

दुसरीकडे, पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊण्ट तयार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. फेक फेसबुक खातं उघडणारा आरोपी महफुज अजीम खान याला उत्तर प्रदेशमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संजय पांडे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊण्ट तयार करुन आरोपीने अनेकांन फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवल्याचं समोर आलं आहे.

नागपुरात पोलीस आयुक्तांच्या नावे फेक अकाऊंट

नुकतेच, नागपूर पोलीस आयुक्तांच्या नावानेही पुन्हा फेक फेसबुक अकाऊंट उघडल्याचे समोर आले होते. सीपी अमितेश कुमार यांचे फेक अकाऊंट तयार करुन पैसे मागितल्याचा प्रकार घडला होता. सायबर गुन्हेगारांकडून वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचेही फेक अकाऊंट केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संबंधित बातम्या :

सायबर गुन्हेगार फोफावले, चक्क पोलिसाचे फेसबुक अकाऊण्ट हॅक, मेसेंजरद्वारे पैशांची मागणी

‘अर्जंट 12 हजारांची आवश्यकता आहे, Google Pay ने पैसे पाठवा’, जिल्हाधिकाऱ्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन पैशांची मागणी

आमदार गीता जैन यांच्या नावे फेक WhatsApp नंबर, स्थानिकांकडे पैशांची मागणी