सायबर गुन्हेगार फोफावले, चक्क पोलिसाचे फेसबुक अकाऊण्ट हॅक, मेसेंजरद्वारे पैशांची मागणी

अतुल दातीर यांच्या फेसबुक अकाऊंटवरून हॅकर्सने अनेकांना मेसेंजरद्वारे पैशाच्या मागणीचे मेसेज केले. कुणाला 8 हजार कुणाला 10 हजार, तर कुणाला 20 हजार रुपयांची मागणी केली.

सायबर गुन्हेगार फोफावले, चक्क पोलिसाचे फेसबुक अकाऊण्ट हॅक, मेसेंजरद्वारे पैशांची मागणी
प्रातिनिधिक फोटो

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात फेसबुक अकाऊंट हॅक करुन फेसबुक फ्रेण्ड्सकडे पैशांची मागणी केली जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. सर्वसामान्य तर सोडाच, आता पोलिसांचेही अकाऊंट सुद्धा हॅक व्हायला सुरुवात झाली आहे. पुसद येथील वाहतूक शाखेत कार्यरत असलेले अतुल दातीर यांचे फेसबुक अकाऊंट हॅकर्सने हॅक केले.

नेमकं काय घडलं?

अतुल दातीर यांच्या फेसबुक अकाऊंटवरून हॅकर्सने अनेकांना मेसेंजरद्वारे पैशाच्या मागणीचे मेसेज केले. कुणाला 8 हजार कुणाला 10 हजार, तर कुणाला 20 हजार रुपयांची मागणी केली. ही बाब अतुल दातीर यांना मित्रांनी सांगितल्यावरून त्यांनी तात्काळ सायबर सेलला या बाबतची तक्रार दाखल केली.

नागरिकांनी पैशाची देवाण-घेवाण करताना शहानिशा करूनच देवाण-घेवाण करा असे आवाहन दातीर यांनी जनतेस केले. याआधी सुद्धा यवतमाळ एसपीच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून एका पत्रकारास पैशाची मागणी केली होती हे विशेष. त्यामुळे फेसबुक वापरकर्त्यांनी यांनी अशा मेसेजला बळी न पडता प्रतिसाद न दिलेलेच बरे असे तज्ज्ञांचे मत आहे.

नागपुरात पोलीस आयुक्तांच्या नावे फेक अकाऊंट

नुकताच, नागपूर पोलीस आयुक्तांच्या नावानेही पुन्हा फेक फेसबूक अकाऊंट उघडल्याचे समोर आले होते. सीपी अमितेश कुमार यांचे फेक अकाऊंट तयार करुन पैसे मागितल्याचा प्रकार घडला. सायबर गुन्हेगारांकडून वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचेही फेक अकाऊंट केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

फेक अकाऊंटवरुन राजकीय पदाधिकाऱ्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली होती. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर आरोपीने त्यांच्याकडून पैसे मागितल्याचा आरोप केला जात आहे. यापूर्वीही नागपूर पोलीस आयुक्तांचं फेक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आलं होतं.

मिरा भाईंदरच्या आमदाराच्या नावे पैशांची मागणी

यापूर्वी, मिरा भाईंदर शहराच्या स्थानिक आमदार गीता जैन (Geeta Jain) यांच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट खाते तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. गीता जैन यांच्या नावे बनावट व्हॉट्सअॅप अकाऊण्ट तयार करण्यात आले होते. या व्हॉट्सअॅप नंबरवर आमदार गीता जैन यांच्या नावासह फोटो जोडण्यात आला होता. फेसबुकचा आधार घेत शहरातील काही नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप करुन पैशांची मागणी करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

‘अर्जंट 12 हजारांची आवश्यकता आहे, Google Pay ने पैसे पाठवा’, जिल्हाधिकाऱ्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन पैशांची मागणी

आमदार गीता जैन यांच्या नावे फेक WhatsApp नंबर, स्थानिकांकडे पैशांची मागणी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI