भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं फेसबुक अकाऊंट हॅक, मित्रांकडे पैशांची मागणी

फेसबुक अकाऊंटवरुन वादग्रस्त पोस्ट किंवा पैशांची मागणी करणे, असे प्रकार घडल्यास, कोणीही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी ट्विटरद्वारे केले आहे.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं फेसबुक अकाऊंट हॅक, मित्रांकडे पैशांची मागणी
भाजप आमदार लक्ष्मण जगताप
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 9:21 AM

पिंपरी चिंचवड : भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Pandurang Jagtap) यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं समोर आलं आहे. जगताप यांच्या नावे सोशल मीडिया अकाऊण्टवरुन पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आपल्या अकाऊण्टवरुन होणाऱ्या हॅकर्सच्या कोणत्याही मागण्यांना उत्तर देऊ नका, असं आवाहन लक्ष्मण जगताप यांनी केलं आहे.

काय आहे प्रकरण?

हॅक झालेल्या फेसबुक अकाऊंटवरुन (Laxmanjagtap Mla) वैयक्तिक मेसेज पाठवून पैसे किंवा इतर वस्तूंची मागणी केली जात आहे. फेसबुक अकाऊंटवरुन वादग्रस्त पोस्ट किंवा पैशांची मागणी करणे, असे प्रकार घडल्यास, कोणीही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी ट्विटरद्वारे केले आहे.

कोण आहेत लक्ष्मण जगताप?

लक्ष्मण जगताप पिंपरी चिंचवडमधून भाजपचे आमदार आहेत. 2009 ते 2014 या काळात जगताप चिंचवड मतदारसंघातून अपक्ष आमदार होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांनी शेकापकडून श्रीरंग बारणेंविरोधात शड्डू ठोकला होता, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून मैदानात उतरले.

मिरा भाईंदरच्या आमदाराच्या नावे पैशांची मागणी

यापूर्वी, मिरा भाईंदर शहराच्या स्थानिक आमदार गीता जैन (Geeta Jain) यांच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट खाते तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. गीता जैन यांच्या नावे बनावट व्हॉट्सअॅप अकाऊण्ट तयार करण्यात आले होते. या व्हॉट्सअॅप नंबरवर आमदार गीता जैन यांच्या नावासह फोटो जोडण्यात आला होता. फेसबुकचा आधार घेत शहरातील काही नागरिकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप करुन पैशांची मागणी करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

‘अर्जंट 12 हजारांची आवश्यकता आहे, Google Pay ने पैसे पाठवा’, जिल्हाधिकाऱ्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन पैशांची मागणी

आमदार गीता जैन यांच्या नावे फेक WhatsApp नंबर, स्थानिकांकडे पैशांची मागणी

पार्थ पवार आणि लक्ष्मण जगतापांच्या भेटीने भुवया उंचावल्या

(Pune Pimpri Chinchwad Cyber Crime Fake Facebook Profile of BJP MLA Laxman Pandurang Jagtap)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.