पोलीस महासंचालक संजय पांडेंचे बनावट फेसबुक अकाऊण्ट, उत्तर प्रदेशातून आरोपीला बेड्या

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 17, 2021 | 10:48 AM

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊण्ट तयार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. फेक फेसबुक अकाऊण्ट तयार करुन आरोपीने अनेकांन फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवल्याचं समोर आलं आहे.

पोलीस महासंचालक संजय पांडेंचे बनावट फेसबुक अकाऊण्ट, उत्तर प्रदेशातून आरोपीला बेड्या
Sanjay Pandey

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई: राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊण्ट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फेक अकाऊण्टवरुन आरोपीने अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊण्ट तयार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. फेक फेसबुक खातं उघडणारा आरोपी महफुज अजीम खान याला उत्तर प्रदेशमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संजय पांडे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊण्ट तयार करुन आरोपीने अनेकांन फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवल्याचं समोर आलं आहे.

पोलीस महासंचालकांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते तयार झाल्याने सायबर विभागाने तात्काळ तपास सुरु करून आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोण आहेत संजय पांडे?

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर असलेले संजय पांडे हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले होते, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

नागपुरात पोलीस आयुक्तांच्या नावे फेक अकाऊंट

नुकतेच, नागपूर पोलीस आयुक्तांच्या नावानेही पुन्हा फेक फेसबुक अकाऊंट उघडल्याचे समोर आले होते. सीपी अमितेश कुमार यांचे फेक अकाऊंट तयार करुन पैसे मागितल्याचा प्रकार घडला होता. सायबर गुन्हेगारांकडून वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचेही फेक अकाऊंट केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

फेक अकाऊंटवरुन राजकीय पदाधिकाऱ्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली होती. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर आरोपीने त्यांच्याकडून पैसे मागितल्याचा आरोप केला जात आहे. यापूर्वीही नागपूर पोलीस आयुक्तांचं फेक फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या :

सायबर गुन्हेगार फोफावले, चक्क पोलिसाचे फेसबुक अकाऊण्ट हॅक, मेसेंजरद्वारे पैशांची मागणी

‘अर्जंट 12 हजारांची आवश्यकता आहे, Google Pay ने पैसे पाठवा’, जिल्हाधिकाऱ्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन पैशांची मागणी

आमदार गीता जैन यांच्या नावे फेक WhatsApp नंबर, स्थानिकांकडे पैशांची मागणी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI