VIDEO | हा व्हिडीओ पाहून तुमचं काळीज तीळ-तीळ तुटेल, लेकरु ओरडतंय ‘पप्पा जाऊ द्या’, नराधम बापाची लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण

वडिलांकडून मुलाला अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सध्या राज्यभरात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी संतापाची भावना व्यक्त केली आहे. वडील मुलाला लाकडी दांड्याने अमानुष मारहाण करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

VIDEO | हा व्हिडीओ पाहून तुमचं काळीज तीळ-तीळ तुटेल, लेकरु ओरडतंय 'पप्पा जाऊ द्या', नराधम बापाची लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण
बापाने मुलाला केलेल्या अमानुष मारहाणीच्या व्हिडीओतील स्क्रिनशॉट
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 8:05 AM

नाशिक : नाशिकमध्ये राजकीय गुन्हेगारी वाढून त्याचं पर्यवसन हत्येमध्ये होण्याच्या घटना वाढल्या असतानाच आता कौटुंबिक स्तरावरील हिंसाचारही समोर झाला आहे. वडिलांनी आपल्या पोटच्या पोराला अमानुष मारहाण केल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या चिमुकल्याची “पप्पा… पप्पा” अशी आर्त साद ऐकून आणि त्याची अवस्था पाहून कोणाच्याही हृदयाला पाझर फुटेल, मात्र या बापाचं मन काही कमकुवत झाल्याचं दिसत नाही.

वडिलांकडून मुलाला अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सध्या राज्यभरात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी संतापाची भावना व्यक्त केली आहे. वडील मुलाला लाकडी दांड्याने अमानुष मारहाण करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये

अडीच मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीलाच लहान मुलगा “पप्पा… पप्पा” असं ओरडत धाय मोकलून रडताना दिसत आहे. “पप्पा.. पप्पा.. नाही.. मला मारायचं नाही” असं चिमुकला जीवाच्या आकांताने ओरडत असतानाही बाप त्याला लाकडी दांडक्याने चोपत असल्याचं दिसतं. मुलगा “नाही.. नाही” असं भोकांड पसरत म्हणत असतानाही बाप त्याच्यावर लाकडी दांड्याने प्रहार करतच सुटला आहे.

सुरुवातीला हा व्हिडीओ कधीचा आहे, कुठला आहे, याविषयी माहिती मिळत नव्हती. ही मारहाण नेमकी कुठल्या कारणावरुन केली जात आहे, याचाही अंदाज लावता येत नाही. हा व्हिडीओ नेमका कोणी शूट केला आहे, तेही समजत नसलं, तरी पार्श्वभूमीवर एका लहान मुलीचा आवाज येत असून ती ‘लड्डू… गप्प बस’ असं म्हणताना ऐकू येते.

लहान मुलीच्या हुंदक्यांचा आवाज

काही वेळाने ती ‘पप्पा जाऊ द्या पप्पा’ असंही म्हणते, मात्र वडील काही केल्या थांबताना दिसत नाहीत. मारता-मारता बापाच्या हातातून ती लाकडी काठी पडते, तसा चिमुकला एका कोपऱ्यात जातो. आपल्या अंगापाशी उशी धरतो, तरीही बाप त्याला खेचून समोर आणतो. यावेळी पार्श्वभूमीवर एका लहान मुलीच्या हुंदक्यांचा आवाज येतो आहे.

आता हा व्हिडीओ नाशिकमधील असल्याचं समोर झालं आहे. मारहाण करणाऱ्या नराधम बापाचं नाव स्पष्ट झालेलं नाही. परंतु सर्वच स्तरातून या क्रूर पित्याला अटक करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे या लेकराला अमानुष मारहाण करणाऱ्या पाषाणहृदयी बापावर पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | गृहपाठ न करता खेळायला गेला, बापाने आठ वर्षांच्या मुलाला हातपाय बांधून छताला उलटं टांगलं

VIDEO : भाईंदरमध्ये ठाण्याची पुनरावृत्ती, फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला

डोंबिवलीत बिअर फुकट दिली नाही म्हणून बार मॅनेजरला मारहाण, सीसीटीव्हीसह डिव्हीआर आणि रोकड घेऊन तरुण पसार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.