वेगवेगळ्या खोलीत जाऊन तिघांचा गळफास, नाशिक हादरलं; असं काय घडलं ज्यामुळे तिघांनी जीवन संपवलं

भीमराव गवळी, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 30, 2023 | 6:33 PM

शिरोडे कुटुंब मूळचे देवळा तालुक्यातील उमराने येथील आहे. गेल्या दहा वर्षापासून व्यवसायानिमित्ताने नाशिकला आले होते. सातपूर येथील राधाकृष्ण नगर येथे हे कुटुंब सध्या राहत होतं.

वेगवेगळ्या खोलीत जाऊन तिघांचा गळफास, नाशिक हादरलं; असं काय घडलं ज्यामुळे तिघांनी जीवन संपवलं
nashik
Image Credit source: Google

नाशिक : नाशिकच्या सातपूरमधील राधाकृष्ण नगर परिसरात काल अत्यंत धक्कादायक घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बाप आणि दोन मुलांनी घरात वेगवेगळ्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक तंगीमुळे या तिघांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे नाशिक हादरले आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे ही आत्महत्या झाल्याचं सांगितलं जात असून त्या दिशेने पोलीस तपास करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दीपक शिरोडे (वडील), मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय 25 ), राकेश शिरोडे (वय 23) अशी आत्महत्या करणाऱ्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे. दीपक शिरोडे यांचा अशोक नगर बस स्टॉप जवळ फळ विक्रीचा व्यवसाय आहे. आर्थिक कारणावरून तिघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

पत्नीला मुलगी झाली

प्रसाद यांची पत्नी गर्भवती होती. त्यामुळे ती मुंबईला गेली होती. काल सकाळीच ती बाळंत झाली. तिने मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर दुपारी प्रसाद यानेही वडील आणि भावासोबत फाशी घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

फळविक्रीचा व्यवसाय

शिरोडे कुटुंब मूळचे देवळा तालुक्यातील उमराने येथील आहे. गेल्या दहा वर्षापासून व्यवसायानिमित्ताने नाशिकला आले होते. सातपूर येथील राधाकृष्ण नगर येथे हे कुटुंब सध्या राहत होतं. दीपक यांचा अशोक नगरच्या शेवटच्या बस स्टॉपवर फळविक्रीचा धंदा होता. प्रसाद आणि राकेश हे दोघे शिवाजी नगरात गाडीवरून फळ विक्रीचा व्यवसाय करायचे.

वडिलांसोबत जीवन संपवण्याचा निर्णय

आर्थिक परिस्थिी बिघडल्याने हे कुटुंब कर्जाच्या ओझ्याखाली होते. त्यामुळे शिरोडे कुटुंबीय टेन्शनमध्ये होते. रविवारी दुपारी घरातील काही लोक बाहेर गेले होते. त्याचवेळी दोन्ही मुलांनी वडिलांसोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर तिघांनी वेगवेगळ्या खोलीत जाऊन पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. घरातील लोक जेव्हा आले. तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना बोलावून दरवाजा तोडला असता या तिघांचे मृतदेह पंख्याला लटकलेले दिसले.

सुसाईड नोट सापडली

घरात एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात सावकाराचं नाव लिहिलेलं आहे. सावकाराच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलीस या दिशेने तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI