AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : अंघोळीसाठी काढलेलं कडकडीत गरम पाणी 10 महिन्यांच्या चिमुकलीवर सांडल्यानं अनर्थ!

अवघ्या 10 महिन्यांचा कोवळा जीव अंघोळीसाठीच्या कडकडीत गरम पाण्यात होरपळला!

Nashik : अंघोळीसाठी काढलेलं कडकडीत गरम पाणी 10 महिन्यांच्या चिमुकलीवर सांडल्यानं अनर्थ!
हृदयद्रावक घटनाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Nov 17, 2022 | 2:30 PM
Share

नाशिक : एक अत्यंत हृदयद्रावक (Heart Breaking incident) घटना समोर आलीय. नाशिकमध्ये एका चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. दहा महिन्यांच्या चिमुकलीवर गरम पाणी सांडलं आणि त्यात ती प्रचंड होरपळली. यातच तिचा जीव घेलाय. गंभीररीत्या भाजलेल्या दहा महिन्यांच्या (10 month child dies) कोवळ्या जीवावर तीन दिवस उपचार सुरु होते. पण तिची मृत्यूशी (Nashik Child Death) सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरलीय. या चिमुकलीच्या मृत्यूने तिच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसलाय. चिमुकलीच्या मृत्यूबाबत कळताच तिच्या आईवडिलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

नाशिक येथील गंगापूर नाका भागात ही धक्कादायक घटना घडली. आवेरा शुभम इंगळे ही अवघ्या दहा महिन्यांची चिमुकली. आवेराच्या जन्माने इंगळे कुटुंबात आनंद संचारला होता. चिमुकल्या आवेराने घरात किलबिलाट झाला होता. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं.

आवेरा इंगळे या चिमुकलीच्या अंघोळीसाठी पाणी गरम करण्यात आलं होतं. हे अंघोळीसाठीचं कडकडीत गरम पाणी बाथरुममध्ये काढून ठेवलं गेलेलं. पण याच गरम पाण्याने आवेराचा घात गेला.

बाथरुममध्ये काढून ठेवलेलं गरम पाणी आवेराच्या अंगावर सांडलं आणि अनर्थ घडला. आवेरा अंगावर गरम पाणी सांडल्यामुळे प्रचंड भाजली गेली. तिचं कोवळं शरीर गंभीररीत्या जखमी झालं. गरम पाण्याने काळीज पिळवटून टाकावा असा आक्रोश आवेराने केला. तिच्या रडण्याच्या आवाजाने घडलेला प्रसंग लगेचच कुटुंबीयांच्या लक्षात आला.

इंगळे कुटुंबीयांनी आवेराला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरु होते. आवेराचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्नांची शर्थ केली जात होती. दरम्यान, मृत्यूशी सुरु असलेली आवेराची झुंज अधिकच कठीण होत गेली होती.

तीन दिवस दहा महिन्यांची आवेरा मृत्यूशी झुंजली. पण तिची झुंज अखेर अपयशी ठरली. मंगळवारी तिने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.