AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये चोरी नाही, तर नजरचूक! दोघा कर्मचाऱ्यांचे निलंबन

हाय सिक्युरिटी झोन असलेल्या आणि देशभरातील नोटा छपाईचं मुख्य केंद्र असलेल्या नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. नोट प्रेस प्रशासनातल्या बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी सुपरवायझरचा बळी दिला जात आहे, अशी सध्या चर्चा आहे.

नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये चोरी नाही, तर नजरचूक! दोघा कर्मचाऱ्यांचे निलंबन
करन्सी नोट प्रेस
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 3:13 PM
Share

नाशिक : नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाख रुपयांच्या नोटा चोरी प्रकरणाला (Nashik Currency Note Press Theft) नाट्यमय वळण मिळालं आहे. करन्सी नोट प्रेसमध्ये चोरी झाली नसून नजरचूक असल्याचा खुलासा करन्सी नोट प्रेस प्रशासनाने केला आहे. ज्या दोन सुपरवायझरच्या नजरचुकीमुळे हा संपूर्ण गोंधळ घडला, त्या दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. नोट प्रेस प्रशासनातल्या बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी सुपरवायझरचा बळी दिला जात आहे, अशी सध्या चर्चा आहे.

काय आहे प्रकरण?

हाय सिक्युरिटी झोन असलेल्या आणि देशभरातील नोटा छपाईचं मुख्य केंद्र असलेल्या नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये यापूर्वी देखील चोरीच्या तुरळक घटना घडल्या, मात्र प्रशासनाने अंतर्गत चौकशीतच हे प्रकरण निकाली काढले होते. तब्बल 5 लाख रुपयांचा हिशोब लागत नसल्याने ही चोरी आहे की अपहार याबाबत चौकशी सुरु करण्यात आली होती. हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याने याबाबत बोलण्यास नोट प्रेस प्रशासकीय अधिकारी किंवा युनियन लीडरही तयार नव्हते. अनेक दिवसांपासून 5 लाखांचा हिशोब लागत नव्हता, पण प्रकरण दडपून ठेवण्याचा प्रयत्न असफल ठरल्याने अखेर नोट प्रेसच्या अधिकाऱ्यांना याबाबत पोलीस स्टेशन गाठावं लागलं, अशी चर्चा होती.

फेब्रुवारीपासून बंडल गहाळ

दरम्यान, या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांकडून माहिती देण्यात आली. 500 रुपयांचे 10 तयार बंडल (शंभर नोटांचे एक बंडल) असे 5 लाख रुपये गहाळ झाल्याचं पोलिसांनी सांगितले होते. 12 फेब्रुवारीपासून हे बंडल गहाळ झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. करन्सी नोट प्रेस प्रशासनाने अंतर्गत चौकशी अहवाल पोलिसांना सुपूर्द केल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला होता. या तपासा दरम्यान करन्सी नोट प्रेसमधील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जाणार असल्याचं पोलीस आयुक्त विजय खरात यांनी सांगितलं होतं.

नाशिक करन्सी नोट प्रेसचा इतिहास

नाशिकमध्ये सिक्युरिटी नोट प्रेसची स्थापना 1924 मध्ये ब्रिटिशांनी केली होती. 1928 मध्ये पहिल्यांदा 5 रुपयांची नोट या नोट प्रेसमध्ये छापण्यात आली. 1980 पर्यंत सिक्युरिटी प्रेसमध्येच नोटा छापल्या जात होत्या. 1980 नंतर करन्सी नोट प्रेसमध्ये नोटा छपाईला सुरुवात झाली. करन्सी नोटप्रेसमध्ये 5, 10, 20, 50, 100, 200, 500 रुपयांच्या नोटा छापल्या जातात. वर्षाला सरासरी 4 हजार दशलक्ष नोटा छापल्या जातात.

संबंधित बातम्या:

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाखांच्या नोटा गायब

नोटा छपाईनंतर विशिष्ट टेबलनंतरच गहाळ, नाशिकच्या करन्सी नोट प्रेस चोरी प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे

(Nashik Currency Note Press five lakh rupees value notes missing were not stolen two supervisors suspended)

भाजपच्या मंत्र्याकडून शिंदेंकडच्या नगरविकास खात्यावर पुन्हा आरोप
भाजपच्या मंत्र्याकडून शिंदेंकडच्या नगरविकास खात्यावर पुन्हा आरोप.
Narhari Zirwal : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले तिसरे मंत्री वादात
Narhari Zirwal : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले तिसरे मंत्री वादात.
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....