AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाखांच्या नोटा गायब, पोलिसांकडून तपासाला सुरुवात

अत्यंत हाय सिक्युरिटी असलेल्या करन्सी नोट प्रेस मधून एवढी मोठी रक्कम नेमकी कशी आणि कुठे गेली याची चौकशी सुरू आहे.

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाखांच्या नोटा गायब, पोलिसांकडून तपासाला सुरुवात
करन्सी नोट प्रेस
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 2:53 PM
Share

नाशिक: नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून 5 लाखांच्या नोटा चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. अत्यंत हाय सिक्युरिटी असलेल्या करन्सी नोट प्रेस मधून एवढी मोठी रक्कम नेमकी कशी आणि कुठे गेली याची चौकशी सुरू असून, पोलीस तपासा सोबतच, करन्सी नोट प्रेसच्या व्यवस्थापनाने प्रकरणाची अंतर्गत चौकशी देखील सुरू केली आहे.

अत्यंत गंभीर प्रकरण

हाय सिक्युरिटी झोन असलेल्या आणि देशभरातील नोटा छपाईच मुख्य केंद्र असलेल्या नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे..तब्बल 5 लाख रुपयांचा हिशोब लागत नसल्याने ही चोरी आहे की अपहार याबाबत चौकशी सुरू झाली आहे..अत्यंत गंभीर प्रकरण असल्याने याबाबत बोलण्यास नोट प्रेस प्रशासकीय अधिकारी किंवा युनियन लीडर देखील तयार नाहीत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून 5 लाखांचा हिशोब लागत नव्हता पण प्रकरण दडपून ठेवण्याचा प्रयत्न असफल ठरल्याने अखेर नोट प्रेसच्या अधिकाऱ्यांना याबाबत पोलीस स्टेशन गाठावे लागलं अशी चर्चा आहे.

फेब्रुवारीपासून बंडल गहाळ

दरम्यान, याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांच्याकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. 500 रुपयांचे 10 तयार बंडल असे 5 लाख रुपये गहाळ झाल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. 12 फेब्रुवारी पासून हे बंडल गहाळ झाले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे..दरम्यान करन्सी नोट प्रेस प्रशासनाने अंतर्गत चौकशी अहवाल पोलिसांना सुपूर्द केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.या तपासा दरम्यान करन्सी नोट प्रेस मधील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले जातील असं पोलीस आयुक्त विजय खरात यांनी सांगितलं आहे.

नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये यापूर्वी देखील चोरीच्या तुरळक घटना घडल्या, मात्र प्रशासनाने अंतर्गत चौकशीतच हे प्रकरण निकली काढले. यावेळी मात्र प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस तपासात या प्रकरणाची अनेक कंगोरे समोर येण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये करन्सी नोट प्रेसचा इतिहास

नाशिकमध्ये सिक्युरिटी नोट प्रेसची स्थापना 1924 साली ब्रिटिशांनी केली. 1928 ला पहिल्यांदा 5 रुपयांची नोट या नोट प्रेसमध्ये छापण्यात आली. 1980 पर्यंत सिक्युरिटी प्रेसमध्येचं नोटा छापल्या जात होत्या. 1980 नंतर करन्सी नोट प्रेसमध्ये नोटा छपाईला सुरुवात झालीय. करन्सी नोटप्रेसमध्ये 5, 10, 20, 50, 100, 200, 500 रुपयांच्या नोटा छापल्या जातात. वर्षाला सरासरी 4 हजार दशलक्ष नोटा छापल्या जातात.

इतर बातम्या:

पुण्यात महिला डॉक्टरच्या बेडरुम-बाथरुममध्ये छुपे कॅमेरे, बड्या एमडी डॉक्टरला अटक

मूकबधिर तरुणीवर बलात्कार करुन मोबाईल चोरी, कल्याण पोलिसांकडून आरोपीला गुजरातमध्ये अटक

Nashik Currency Note Press five lakh rupees value notes are missing case registered in police

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.