नोटा छपाईनंतर विशिष्ट टेबलनंतरच गहाळ, नाशिकच्या करन्सी नोट प्रेस चोरी प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे

चंदन पुजाधिकारी

चंदन पुजाधिकारी | Edited By: अनिश बेंद्रे

Updated on: Jul 16, 2021 | 10:34 AM

500 रुपयांचे 10 तयार बंडल (शंभर नोटांचे एक बंडल) असे 5 लाख रुपये गहाळ झाल्याचं पोलिसांनी सांगितले. 12 फेब्रुवारीपासून हे बंडल गहाळ झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नोटा छपाईनंतर विशिष्ट टेबलनंतरच गहाळ, नाशिकच्या करन्सी नोट प्रेस चोरी प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे
करन्सी नोट प्रेस

नाशिक : नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाख रुपयांच्या नोटा चोरी प्रकरणात (Nashik Currency Note Press Theft) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नोटा छापल्यानंतर विशिष्ट टेबलवरुन पुढे जातानाच गहाळ होत असल्याचा संशय आहे. पोलिसांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. नोटा चोरीचे धागेदोरे करन्सी नोट प्रेसमध्येच सापडण्याची शक्यता आहे. उपनगर पोलिसांकडून प्रत्यक्ष नोट प्रेसमध्ये जाऊन प्रकरणाचा तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

हाय सिक्युरिटी झोन असलेल्या आणि देशभरातील नोटा छपाईचं मुख्य केंद्र असलेल्या नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल 5 लाख रुपयांचा हिशोब लागत नसल्याने ही चोरी आहे की अपहार याबाबत चौकशी सुरु झाली आहे. हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याने याबाबत बोलण्यास नोट प्रेस प्रशासकीय अधिकारी किंवा युनियन लीडरही तयार नाहीत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून 5 लाखांचा हिशोब लागत नव्हता, पण प्रकरण दडपून ठेवण्याचा प्रयत्न असफल ठरल्याने अखेर नोट प्रेसच्या अधिकाऱ्यांना याबाबत पोलीस स्टेशन गाठावं लागलं, अशी चर्चा आहे.

फेब्रुवारीपासून बंडल गहाळ

दरम्यान, या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. 500 रुपयांचे 10 तयार बंडल (शंभर नोटांचे एक बंडल) असे 5 लाख रुपये गहाळ झाल्याचं पोलिसांनी सांगितले. 12 फेब्रुवारीपासून हे बंडल गहाळ झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान करन्सी नोट प्रेस प्रशासनाने अंतर्गत चौकशी अहवाल पोलिसांना सुपूर्द केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या तपासा दरम्यान करन्सी नोट प्रेस मधील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले जातील असं पोलीस आयुक्त विजय खरात यांनी सांगितलं आहे.

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये यापूर्वी देखील चोरीच्या तुरळक घटना घडल्या, मात्र प्रशासनाने अंतर्गत चौकशीतच हे प्रकरण निकाली काढले होते. यावेळी मात्र प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस तपासात या प्रकरणाचे अनेक कंगोरे समोर येण्याची शक्यता आहे.

नाशिक करन्सी नोट प्रेसचा इतिहास

नाशिकमध्ये सिक्युरिटी नोट प्रेसची स्थापना 1924 मध्ये ब्रिटिशांनी केली होती. 1928 मध्ये पहिल्यांदा 5 रुपयांची नोट या नोट प्रेसमध्ये छापण्यात आली. 1980 पर्यंत सिक्युरिटी प्रेसमध्येच नोटा छापल्या जात होत्या. 1980 नंतर करन्सी नोट प्रेसमध्ये नोटा छपाईला सुरुवात झाली. करन्सी नोटप्रेसमध्ये 5, 10, 20, 50, 100, 200, 500 रुपयांच्या नोटा छापल्या जातात. वर्षाला सरासरी 4 हजार दशलक्ष नोटा छापल्या जातात.

संबंधित बातम्या:

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाखांच्या नोटा गायब

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाखांची चोरी, पोलिसात गुन्हा

(Nashik Currency Note Press five lakh rupees value notes missing Police gets important info)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI