Nashik: गॅस गळतीनंतर भीषण स्फोट! स्फोटात महिलेचा जागीच मृत्यू,, तर 16 वर्षीय तरुणी भाजली

Nashik Cylinder Blast: घरातील गॅसमधून गळती होत असल्यास त्याकडे थोडंही दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं, हे या घटनेमुळे अधोरेखित झालंय.

Nashik: गॅस गळतीनंतर भीषण स्फोट! स्फोटात महिलेचा जागीच मृत्यू,, तर 16 वर्षीय तरुणी भाजली
सिलिंजर स्फोटात महिलेचा मृत्यू
Image Credit source: TV9 Marathi
चंदन पुजाधिकारी

| Edited By: सिद्धेश सावंत

Apr 21, 2022 | 10:30 AM

नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. नाशकात सातपूर परिसरात गॅस गळती होऊन भीषण स्फोट (Gas Cylinder Blast) झाला. स्फोटात अर्चना सिंग या महिलेचा मृत्यू झाला. स्फोटानंतर ही महिला होरपळून जागीच ठार (Lady died in cylinder blast) झाली. दरम्यान, गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये एका तरुणीही भाजली आहे. या भीषण घटनेमध्ये घरातील सामानालाही फटका बसला. सिलिंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक झालंय. या भीषण स्फोटात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव अर्चना सिंह असं आहे. तर स्फोटात आस्था सिंग ही 16 वर्षांची मुलगी भाजली. यानंतर आगीत भाजल्या गेलेल्या जखमी मुलीला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या मुलीवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर आहे.

गॅस गळतीकडे दुर्लक्ष नको..

गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला असावा, असा संशय या घटनेनंतर व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे घरातील गॅसमधून गळती होत असल्यास त्याकडे थोडंही दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं, हे या घटनेमुळे अधोरेखित झालंय. गेल्या काही काळापासूनच गॅल सिलिंडरचे स्फोट होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. घरोघरी असणारा हा सिलिंडर मृत्यूचं कारण ठरु नये, यासाठी खबरदारी बाळगण्याचं आवाहन आता केलं जातंय.

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या सहा वर्षात गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याच्या घटनांची आकडेवारीही समोर आली आहे. एका वृत्तपत्रानं दिलेल्या आकडेवारीनुसार 332 वेळा गॅस सिलिंडरचा स्फोट हा गॅस गळतीमुळे झालेला आहे. ही आकडेवारी सहा वर्षांच्या तुलनेत कमी असली, तरिहीही या घटनांना रोखण्याचं आव्हानही कायम आहेच. काही आठवड्यांपूर्वी पुण्यातही अशाच प्रकार गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी परिसर हादरुन गेला होता. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ देखील समोल आला होता.

पाहा व्हिडीओ : पुण्यात गॅस सिलिंडरचा स्फोट

दरम्यान, नाशिकमध्ये झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात सिंग कुटुंबीयातील एक महिला मृत्यूमुखी पडल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तर घरातील सामान जळून खाक झाल्यानं मोठं आर्थिक नुकसानही झालं आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यातली स्फोटांची मालिका संपेना, चाकण औद्योगिक वसाहतीतही मोठा ब्लास्ट

नाशिकमध्ये गॅसच्या स्फोटात स्वयंपाकी ठार

काळजाचा थरकाप उडवणारी घटना; नाशिकमध्ये पाण्याच्या बादलीत पडून 6 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें