नाशिक शिक्षणाधिकारी लाच प्रकरण, वैशाली झनकर यांचा जामीन अर्ज फेटाळला, आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 14, 2021 | 7:17 PM

आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचा जामीन अर्ज आज (14 ऑगस्ट) पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयाने फेटाळला. तसेच जामीन अर्ज फेटाळत अधिक चौकशी करण्यासाठी त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आलीय.

नाशिक शिक्षणाधिकारी लाच प्रकरण, वैशाली झनकर यांचा जामीन अर्ज फेटाळला, आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी
वैशाली झनकर
Follow us

नाशिक : आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर (Vaishali Veer-Zankar) यांचा जामीन अर्ज आज (14 ऑगस्ट) पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयाने फेटाळला. तसेच जामीन अर्ज फेटाळत अधिक चौकशी करण्यासाठी त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आलीय. ठाणे लाचलुचपत विभागाने अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने कोठडी वाढवण्याचा निकाल दिला. (Nashik District Court today rejected bail application of Vaishali Veer-Zankar the main accused in the Rs 8 lakh bribery case )

झनकर यांना आणखी दोन दिवस पोलीस कोठडी

शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी 8 लाख रुपये लाच घेताना पकडल्या गेलेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या जानिमाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. तसेच ठाणे लाचलुचपत विभागाची अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायालयाने झनकर यांना आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिलाय. तसेच या प्रकरणातील दोन संशयित आरोपी चालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबितआहे.

नेमके प्रकरण काय आहे ?

शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलंय. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

अनुदानाला मंजुरीसाठी संस्थेकडे 9 लाखांची मागणी, 8 लाखावर तडजोड

आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांनी एका संस्था चालकांकडे सरकारकडून मिळणारं 20 टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती. संस्था मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी करत होती. ही ऑर्डर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेकडून सुमारे 9 लाख रुपयांची लाच मागितली. यावेळी तक्रारदारांनी तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचे कबूल केले. मंगळवारी (10 ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने झनकर यांना अटक केली होती.

इतर बातम्या :

किरीट सोमय्यांचा बेकायदा उत्खननाचा आरोप आमदार सुनील शेळकेनी फेटाळला, नेमकं प्रकरण काय?

क्रीडा विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन खासदार इम्तियाज जलील आक्रमक, स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जाणार

‘महामार्गांच्या कामाला शिवसेनेचा विरोध नाही’, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाशिमच्या सेना लोकप्रतिनिधीचा दावा

(Nashik District Court today rejected bail application of Vaishali Veer-Zankar the main accused in the Rs 8 lakh bribery case)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI