Video | बापरे! स्टंट जीवावर बेतला, गिरणा नदीच्या पुराच्या पाण्यात स्टंट करताना तरुण गेला वाहून

गिरणा नदीच्या पुराच्या पाण्यात पुलावरून स्टंटबाजी करताना वाहून गेलेल्या तरूणाचे नाव नईम अमीन आहे. तो मालेगावचाच रहिवाशी असल्याचे कळते आहे. या तरूणाचा शोध घेतला जात आहे, मात्र तो अजून सापडला नाही. रात्री अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती.

Video | बापरे! स्टंट जीवावर बेतला, गिरणा नदीच्या पुराच्या पाण्यात स्टंट करताना तरुण गेला वाहून
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 10:18 AM

मालेगाव : मालेगावात (Malegaon) एक धक्कादायक घडना घडलीयं. पुराच्या पाण्यात उडी मारून स्टंटबाजी करणारा तरूण वाहून गेलायं. गिरणा नदीला पूर आल्याने पाण्याची पातळी वाढली होती. मात्र, याचदरम्यान एक तरूण स्टंटबाजी करण्यासाठी नदीच्या (River) पुलावर चढला आणि चक्क पुराच्या पाण्यात वाहून गेला. तरूणाचा हा स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नाशिक जिल्हात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस (Rain) सुरू असल्याने जिल्हातील अनेक नद्यांना पूर आलायं.

इथे पाहा तरूणाचा स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ

गिरणा नदीच्या पुलावर तरूणाची स्टंटबाजी

गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करताना तरूण वाहून गेल्याने मालेगावात एकच खळबळ उडाली आहे. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करताना यापूर्वींही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, असे असतांना देखील तरूण नदीला पूर आल्यानंतर स्टंटबाजी करण्यापासून स्वत: ला रोखू शकत नाहीयंत. गिरणा नदीला पूर आला असताना तरूणाने नदीत उडी घेतली आणि वाहून गेला.

हे सुद्धा वाचा

स्टंटबाजी करताना तरूण पुराच्या पाण्यात वाहून गेला

गिरणा नदीच्या पुराच्या पाण्यात पुलावरून स्टंटबाजी करताना वाहून गेलेल्या तरूणाचे नाव नईम अमीन आहे. तो मालेगावचाच रहिवाशी असल्याचे कळते आहे. या तरूणाचा शोध घेतला जात आहे, मात्र तो अजून सापडला नाही. रात्री अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती. आज सकाळी परत एकदा तरूणाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Non Stop LIVE Update
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.