इगतपुरीत हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा, आरोपींना न्यायालयाने सुनावली कोठडी

इगतपुरी न्यायालयाने 52 तरुण, 18 तरुणींना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली तर देहविक्रीसाठी मुली पुरवणाऱ्या दोन महिला शिल्पा सिराज कुरेशी व दीपाली देवळेकर या दोन महिलांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती सरकारी वकील अँड. अर्चना महाले यांनी दिली.

इगतपुरीत हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा, आरोपींना न्यायालयाने सुनावली कोठडी
कुख्यात गुंड आणि मोक्काच्या आरोपींच्या संपत्तीवर नागपूर पोलिसांची कारवाई
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 2:39 AM

इगतपुरी / शैलेश पुरोहित : इगतपुरीतील माऊंटन शॉडो रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्टी (Hukkah Party)वर रविवारी मध्यरात्री पोलिसांनी छापा (Raid) टाकला होता. यामध्ये रेवती कंपनीच्या हार्डवेअर स्पेअरपार्ट कंपनीतील देशातील प्रत्येक राज्यातील होलसेल डिस्ट्रीब्यूटर असलेले 52 तरुण व देहविक्री करणार्‍या 18 तरुणींसह 2 महिलांना पोलिसांनी अटक केली होती. या सर्व आरोपींना सोमवारी इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. न्यायालयाने 52 तरुण आणि 18 तरुणींना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. तर देहविक्रीसाठी मुली पुरवणाऱ्या दोन महिला शिल्पा सिराज कुरेशी व दिपाली देवळेकर यांना 16 मार्चपर्यंत महिला पुरवण्याच्या आरोपामध्ये चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनवण्यात आली. (Police raid hookah party in Igatpuri, accused remanded in custody)

गुन्हे पथकाने छापा टाकत आरोपींना रंगेहाथ पकडले

अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाने माऊंटन शॉडो रिसॉर्टमध्ये छापा मारून रंगेहाथ हुक्कापार्टी करताना आरोपींना पकडले होते. याबाबत त्यांच्यावर इगतपुरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार कायदा व सिगारेट तंबाखू मुंबई प्रोविजन अॅक्ट या कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व आरोपींना इगतपुरी पोलिसांनी इगतपुरी न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील व आरोपींचे वकील यांच्यामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत युक्तीवाद झाला. आरोपींचे वकील अँड. राहुल कासलीवाल, सचिन भाटी, नदीम मेमन, विलास पाटील, संदेश देशमुख आदी वकिलांनी सरकारी वकीलाशी युक्तीवाद केला.

संशयित आरोपींच्या जामिन अर्जावर उद्या सुनावणी

यानंतर इगतपुरी न्यायालयाने 52 तरुण, 18 तरुणींना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली तर देहविक्रीसाठी मुली पुरवणाऱ्या दोन महिला शिल्पा सिराज कुरेशी व दीपाली देवळेकर या दोन महिलांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती सरकारी वकील अँड. अर्चना महाले यांनी दिली. बाकी 18 महिलांना कलम 15 प्रमाणे वात्सल्य होम प्रोटेक्शन येथे ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या तरूणींचे नातेवाईक आल्यावर त्यांच्या ताब्यात कस्टडी दिली जाईल असे सांगितले. तसेच उरलेल्या संशयित आरोपीचे जामीन अर्ज उद्या न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. (Police raid hookah party in Igatpuri, accused remanded in custody)

इतर बातम्या

Pune : एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला झालेल्या विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक! रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं

सोलापुरात दुचाकीची कंटेनरला धडक, एकाचा मृत्यू, जमावानं आरटीओ पथकाला बेदम बदडलं

Non Stop LIVE Update
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.