Nashik Crime | डॉ. सुवर्णा वाजेंनी पतींना रात्री तसा मेसेज का केला, त्यांच्यासोबत कोण होते, मृत्यूचे गूढ काय?

| Updated on: Jan 26, 2022 | 4:08 PM

नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे-जाधव यांनी रात्री आपल्या पतींना एक मेसेज पाठवला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. नेमका हा प्रकार कशाचा आहे, घातपात की आणखी काही, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Nashik Crime | डॉ. सुवर्णा वाजेंनी पतींना रात्री तसा मेसेज का केला, त्यांच्यासोबत कोण होते, मृत्यूचे गूढ काय?
नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा, कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या
Follow us on

नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेच्या (Municipal Corporation) वैद्यकीय अधिकारी (Medical officer) डॉ. सुवर्णा वाजे-जाधव यांचा कारमध्ये जळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, तत्पूर्वी त्यांनी मगंळवारी रात्री आपल्या पतींना एक मेसेज पाठवला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. नेमका हा प्रकार कशाचा आहे, घातपात की आणखी काही, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, या घटनेने महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कारमध्ये चक्क जळालेली हाडे

डॉ. सुवर्णा वाजे-जाधव या गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. तेव्हा मंगळवारी रात्री मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती. ही हाडे सुद्धा त्यांची असल्याची समजते. वाडीवऱ्हे पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी अधिक तपास सुरू केला आहे. घटनास्थळावर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाले. पोलिसांनी तपास कार्य सुरू केले आहे. मात्र, अचानक एका अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने चर्चांना उधाण आले आहे. खरेच ती हाडे आणि तो मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तसा मेसेज का पाठवला?

डॉ. सुवर्णा वाजे यांनी मंगळवारी पतींना एक मेसेज पाठवला. त्यात रात्री 11 वाजेपर्यंत मिटींग आहे. त्यामुळे यायला उशीर होईल, असे कळवले होते. मात्र, त्यानंतरही त्या परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे पती व वडिलांनी महापालिकेतल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना रात्री कसलिही मिटींग नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कुटुंबाने डॉ. सुवर्णा वाजे यांचा शोध सुरू केला. रात्री साडेअकरा वाजता अंबड पोलीस ठाण्यात जावून त्यांनी तक्रारही नोंदवली. डॉ. वाजे या मंगळवारी सायंकाळपर्यंत रुग्णालयात होत्या. तिथेही त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही टेन्शन नव्हते. वागणेही नेहमीप्रमाणे होते. मात्र, त्यांनी कसलिही बैठक नसताना पतींना तसा मेसेज का पाठवला, त्यांच्यासोबत कोण होते, शेवटी त्या कोणाला भेटल्या आणि त्यांचा मृत्यू कसा झाला, अशी नाना प्रश्न निर्माण होत आहेत.

कर्तबगार अधिकारी

डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप पाडली. त्यामुळे पालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. विशेष म्हणजे मंगळवारी सायंकाळीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही टेन्शन नव्हते. मात्र, काही क्षणात होत्याचे नव्हते कसे झाले, अचानक असे काय घडले, याचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!