AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीड लाख रुपयांच्या शेळ्या टेम्पोतून चोरुन नेल्या, शेड केलं रिकामं, मग लावला अंदाज…

नाशिक जिल्ह्यात मागच्या काही दिवसात चोरीच्या घटनात अधिक वाढ झाली आहे. वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यामुळे पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

दीड लाख रुपयांच्या शेळ्या टेम्पोतून चोरुन नेल्या, शेड केलं रिकामं, मग लावला अंदाज...
नाशिकमध्ये शेळ्या चोरल्याImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 18, 2023 | 7:55 AM
Share

मनोहर शेवाळे, मालेगाव : नाशिकच्या नांदगाव (nashik nandgaon) तालुक्यात काल ट्रॅक्टर चोरीची (Tractor stolen) घटना ताजी असताना तालुक्यातील जळगाव-बुद्रुक (jalgaon budruk) येथील शेतकरी सुदाम आहिरे यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील जवळ पास 25 ते 27 शेळ्यांची रात्रीत चोरी झाली आहे. अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना समोर आलीय. सुदाम आहिरे यांचा शेळी पालनाचा व्यवसाय असून त्यांनी आपल्या शेतात छोटेसे पत्र्याचे शेड तयार करुन त्यात लहान-मोठ्या अशा 25 ते 27 शेळ्या पाळल्या होत्या. याबाबत त्यांनी जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये चोर झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून याची चौकशी सुरु आहे.

कुटुंबाचा अर्थिक सोर्स चोरुन नेल्याने शेतकरी हतबल

शेतकरी सुदाम आहिरे यांचा शेळी पालन करण्याचा व्यवसाय आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून ते शेती करीत शेळीचं पालन करीत आहे. काल मध्यरात्री चोरट्यांनी शेडला लावलेलं कुलूप तोडून त्यातील शेळ्या चोरुन नेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकरी सुदाम आहिरे पुर्णपणे हतबल झाले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळी पालन या व्यवसायावरती असल्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठा प्रसंग उभा राहिला आहे.

कशी केली चोरी

काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेडचे कुलीप तोडून सगळ्या शेळ्या पायी चालवत डोंगर पार करत त्या कसारी घाटापर्यंत नेल्या आणि तेथून त्या वाहनातून नेल्या असल्याचा अंदाज अनेकांनी वर्तविला असून याप्रकरणी नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व शेळ्यांची किंमत 1 लाख 76 हजार रुपये असल्याच शेतक-याने सांगितलय.

पोलिसांनी नागरिकांना जागृत राहण्याचं आवाहन केलं आहे.

नाशिक जिल्ह्यात मागच्या काही दिवसात चोरीच्या घटनात अधिक वाढ झाली आहे. वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यामुळे पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. ट्रॅक्टरची चोरी झाल्यानंतर लगेच शेळ्यांची चोरी झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. पोलिसांनी नागरिकांना जागृत राहण्याचं आवाहन केलं आहे. पोलिस विविध मार्गानी या घटनेचा तपास करीत आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच