फ्लॅट घेत असल्यानं ते आनंदात होते, लाखों रुपये देऊन इसार पावती केली; नंतर समोर आलं धक्कादायक प्रकरण

नाशिकमध्ये पंधरा दिवसाच्या आतमध्ये फ्लॅट विक्री करत फसवणूक केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. फसवणुकीचा हा धक्कादायक फंडा ऐकून पोलिसही चक्रावले आहे.

फ्लॅट घेत असल्यानं ते आनंदात होते, लाखों रुपये देऊन इसार पावती केली; नंतर समोर आलं धक्कादायक प्रकरण
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 12:59 PM

नाशिक : नाशिकच्या अंबड पोलिस ( Nashik Police ) ठाण्याच्या हद्दीत फ्लॅट विक्रीत सातबारा उताऱ्यावरील बोजा कायम ठेवून गंडा घातल्याचं प्रकरण ताजं असतांना आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अंबड पोलिस ठाण्यात नुकताच एक गुन्हा दाखल झाला असून तब्बल 24 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला असून त्यापूर्वी केलेल्या व्यवहाराच्या बाबी पाहून पोलिसही चक्रावले आहे. त्यामुळे फ्लॅट खरेदीच्या फसवणुकीचा हा फंडा ( Fraud Case ) अनेकांना धक्का देणारा असून अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अधिकचा तपास सुरू केला आहे.

प्रकरण नेमकं काय ?

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फ्लॅटचे मालक असल्याचे सांगून व्यवहार केला. यामध्ये विमान कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत व्यवहार केला होता. राणेनगर येथे इंडियन‎ एअरलाइन्सचे जुने फ्लॅट आहेत. त्या फ्लॅटची विक्री करायची म्हणून व्यवहार केला. इसार पावतीही केली. इतकंच काय करारनामा केला. मात्र टायरल व्हेरीफीकेशन केल्यावर धक्कादायक बाब समोर आली.

हे सुद्धा वाचा

संशयित आरोपी कोण ?

संजय गोसावी, भीमा वाघमारे, छाया आव्हाड, प्रशांत‎ आव्हाड, आनंद भट्टड हे संशयित आरोपी असून त्याच्यावर अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी विमान कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून व्यवहार करत 24 लाखांची फसवणूक केली. यामध्ये तीन जणांची फसवणूक झाली आहे.

कुणाची झाली फसवणूक ?

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मूळ रहिवाशी कैलास महाजन त्यांचे मावसभाऊ किरण बिरारी आणि संदीप बोरसे‎ या तिघांची फसवणूक झाली आहे. फ्लॅटचा व्यवहार करत इसार पावती केली होती. त्यानंतर करारनामा ही केला. मात्र बँकेने टायटल व्हेरीफीकेशन मागणी केल्यावर त्याची पूर्तता करत असतांना फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.

फ्लॅट खरेदी करतांना काय काळजी घ्याल?

फ्लॅट किंवा घर खरेदी करत असतांना सातबारा उतारा तपासून घ्यावा. टायटल व्हेरीफीकेशन करून घेणे. जुना सर्च रिपोर्ट बघून घ्यावा किंवा तो काढून एकदा तपासणी करून घ्याव्या. जागेच्या आणि इमारतीच्या नोंदी तलाठी कार्यालयातून एकदा तपासणी करून घ्याव्या.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.