तो प्रेमात अडसर ठरायचा, नव्यानं संसार थाटायचा होता; सोबत बसून दारू पाजली आणि नंतर जे घडलं ते भयंकर होतं…

नाशिकच्या जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आली असून उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. एका हत्येच्या घटनेचा उलगडा झाल्याने पोलिस देखील चक्रावून गेले आहे.

तो प्रेमात अडसर ठरायचा, नव्यानं संसार थाटायचा होता; सोबत बसून दारू पाजली आणि नंतर जे घडलं ते भयंकर होतं...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 7:36 AM

नाशिक : अनेकदा काही व्यक्तींना लग्नानंतरही प्रेम होतं. त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होतात. पण प्रेमाच्या नादात ते असं काही करून बसतात की त्यांना थेट तुरुंगात जाण्याची वेळ येते. नाशिकमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहित महिलेचा पती प्रेमात अडसर ठरत असल्याने त्याने जो काही प्लॅन रचला तो सध्या नाशिकच्या ग्रामीण हद्दीत चर्चेचा विषय ठरला आहे. जायखेडा पोलिसांनी ही घटना उघडकीस आणलीय. सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील मोसम नदी काठावर एक मृतदेह असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली होती. मृतदेहाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर प्रचंड जखमा होत्या त्यावरून हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला होता.

जायखेडा पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने या घटनेचा तपास केला. त्यामध्ये मृतदेह हा लाडूद येथील दत्तात्रय ठाकरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामध्ये पोलिसांचा तपास सुरू असतांना पत्नीची कसून तपासणी करण्यात आली.

पत्नी माधुरी ठाकरे यांनी दिलेल्या माहिती पोलिसांना संशय आला होता. त्यामध्ये पोलिसांना तिचा प्रियकर असल्याची माहिती दिली होती. त्यामध्ये नंदुरबार येथील आसने गावातील भरत इलाचंद पाटील याच्याशी तिचे प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली.

हे सुद्धा वाचा

प्रियकर याने दत्तात्रय ठाकरे यास दारू पंजून मोसम नदी काठावर घेऊन जात ठार मार होते. पोलिसांनी हा तपास अवघ्या आठ तासात करत गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी मयत ठाकरे याच्या पत्नीसह दोन प्रियकर आणि त्याचा साथीदार याला अटक केली आहे.

प्रेमासाठी अनेक जण असं काही करतात की ज्यामुळे थेट तुरुंगात जाण्याची वेळ येते. सुखीसंसारात प्रेम प्रकरण आल्याने जायखेडा येथील हे धक्कादायक प्रकरण समोर आले. प्रेमात प्रेयसीचा पती अडथळा येत असल्याने केलेले कृत्याने खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.