शेती नावावर करण्यासाठी नातवाचा पराक्रम, प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले; आजी जीवंत असताना…

जमीन लाटण्यासाठी नातवाने शक्कल लढवून कारनामा केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने धक्कादायक बाब समोर आली आहे.

शेती नावावर करण्यासाठी नातवाचा पराक्रम, प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले; आजी जीवंत असताना...
नाशिकमध्ये कौटुंबिक वादातून भावाने भावाला संपवलेImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 6:28 PM

नाशिक : खरंतर जमीन नावावर करण्यासाठी लागणारे कागदपत्रे पाहता अत्यंत किचकट प्रक्रिया असते. त्यात जर मृत व्यक्तीच्या वारसाला नाव लावायचे असेल तर कागदपत्रे नावावर करता करता दमछाक होत असते. पण नाशिक मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी दखल न घेतल्याने न्यायायलात धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजी जीवंत असताना नातवाने आजीला मृत दाखवत जमीन नावावर करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना उगडकिस आल्याने खळबळ उडाली आहे.

सत्तरवर्षीय वयोवृद्ध आज्जीच्या ऐवजी नावात साधर्म असल्याचा फायदा घेत मृत महिलेचा मृत्यूचा पुरावा दाखत आणि आजीचा वारसदार असल्याचं सिद्ध करत सात बारा उताऱ्यावर नाव लावल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

निफाड तालुक्यातील मुखेड येथील सरस्वतीबाई संपत महाले या आजीच्या नावावर दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथे जवळपास अडीच हेक्टर शेती आहे. तीच शेती लाटण्यासाठी आजीचा नातू विलास पांडुरंग पवार याने कारणामा केला आहे.

हे सुद्धा वाचा

विलास पांडुरंग पवार हा नाशिकच्या गंगापुर रोड परिसरात राहतो. दुसऱ्याच महिलेच्या मृत दाखल्याचा आधार घेत खोटे कागदपत्रे बनवून तक्रारदार सरस्वतीबाई महाले यांचे नावे कमी करत स्वतःचे नाव लावून घेत जमीन लाटली होती.

खरंतर ही प्रक्रिया करत असतांना महसूल अधिकारी बारकाईने तपासणी करत असतात. मात्र, या प्रकरणात तसे न करता विलास पंगत या नावाची चुकीच्या पद्धतीने नोंद केल्याचे उघडकीस आले आहे.

तक्रारदार यांनी 2022 मध्ये उतारा काढल्यानंतर ही बाब उघडकीस आली होती. त्यानंतर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. नंतर पोलिस अधिक्षक यांच्याकडेही धाव घेतली होती. मात्र, तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून अधिकचा तपास केला जात आहे.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.