सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरण, दोन फरार ड्रग्ज पेडलर एनसीबीच्या ताब्यात

ड्रग्स पेडलर हरीश खान याला एनसीबीने अटक केला आहे, तर साकीब खानला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे (NCB drug peddler Harish Khan )

सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरण, दोन फरार ड्रग्ज पेडलर एनसीबीच्या ताब्यात
सुशांत सिंह राजपूत
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 3:14 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात (Sushant Singh Rajput Suicide related Drugs Nexus) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दोन ड्रग्ज पेडलरना ताब्यात घेतलं आहे. हरीश खान आणि साकीब खान हे दोघेही फरार आरोपी आहेत. सुशांतला दिल्या जाणाऱ्या ड्रग्जचा पुरवठा हरीशकडून होत असल्याचा एनसीबीला संशय आहे. (NCB arrested drug peddler Harish Khan in Bandra in drugs case linked to Sushant Singh Rajput)

ड्रग्स पेडलर हरीश खान याला एनसीबीने अटक केला आहे, तर साकीब खानला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. सुशांत सिंग राजपूतला जे ड्रग्ज दिलं जात होतं, ते हरीश खानकडून आणलं जात होतं, असा एनसीबी अधिकाऱ्यांना संशय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे, सुशांतच्या जवळच्या मित्रांचा शोध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुरु केला आहे. सुशांतसोबत गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी याशिवाय सुशांतचे नोकर केशव बचनेर, नीरज सिंग असे अनेक जण राहत होते.

केशव आणि नीरज होणार साक्षीदार

मुंबईत उपलब्ध असलेल्या व्यक्तींची अनेक यंत्रणांनी चौकशी केली होती. मात्र सिद्धार्थ पिठाणी, केशव, नीरज हे तेव्हा मुंबईच्या बाहेर पळून गेले होते. एनसीबी अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ पिठाणी याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे, तर केशव आणि नीरज यांना साक्षीदार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज रॅकेटचा तपास एनसीबीही करत असून दाखल गुन्ह्यात आतापर्यंत 35 जणांना अटक करण्यात आली आहे.

सुशांतच्या ड्रग्जविषयी दोघांना माहिती?

सिद्धार्थ पिठाणी याच्या चौकशीत नीरज आणि केशव यांचं नाव आलं होतं. नीरज सिंग आणि केशव बचनेर हे दोघे सुशांतकडे घरकाम करत होते. सुशांतला कोण कोण ड्रग्ज देत होतं, कोण ड्रग्ज मागवत होतं, याची सर्व माहिती पिठाणीप्रमाणेच केशव आणि नीरज यांना होती. एनसीबी अधिकाऱ्यांनी पिठाणीला अटक केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या नीरज आणि केशव यांच्याही अटकेची शक्यता व्यक्त केली जात होती. या दोघांना काल एनसीबी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.

साक्षीदार होण्याची तयारी

अभिनेत्री सारा अली खान हिच्या घरी कुक म्हणून काम करणाऱ्या केशवला एनसीबी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. तर अभिनेता फरहान अख्तरच्या घरी काम करत असलेल्या नीरजलाही ताब्यात घेतलं. त्याच्याकडे सतत चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी या प्रकरणात साक्षीदार होण्याची तयारी दाखवली. या चौकशीनंतर दोघांनी या प्रकरणात साक्षीदार होण्याचं कबूल केलं. त्यानंतर त्यांची महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर साक्ष नोंवण्याची प्रक्रिया सुरू झाली.

सुशांतसोबत राहणाऱ्या अनेक जणांपैकी काही जण परदेशात, तर काही जण भारताच्या वेगवेगळ्या भागात निघून गेले आहेत. त्यांना सुशांतसोबत नक्की काय झालं याची संपूर्ण माहिती आहे. त्यापैकी काही जणांची नावं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहेत. त्यांच्या मागावर एनसीबीचे अधिकारी आहेत.

संबंधित बातम्या :

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वात मोठी कारवाई, रुममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 35 वी अटक, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंवर कौतुकाचा वर्षाव

सुशांतच्या जवळच्या मित्रांचा NCB कडून शोध, तर नोकर केशव-नीरज साक्षीदार होणार

(NCB arrested drug peddler Harish Khan in Bandra in drugs case linked to Sushant Singh Rajput)

Non Stop LIVE Update
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.