AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणी भरण्यावरुन शेजारणींमध्ये वाद झाला, वाद इतका विकोपाला गेला की शेजाऱ्याने थेट…

पाणी भरण्यावरुन दोन शेजारणींमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि दोन्ही कुटुंबेही भांडणात सहभागी झाली. काही वेळाने भांडण मिटले, मात्र भांडणाचा राग मनातून गेला नव्हता.

पाणी भरण्यावरुन शेजारणींमध्ये वाद झाला, वाद इतका विकोपाला गेला की शेजाऱ्याने थेट...
पाण्यावरुन झालेल्या भांडणातून शेजाऱ्याने शेजाऱ्याला संपवलेImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 18, 2023 | 3:57 PM
Share

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एकच खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पाणी भरण्यावरुन झालेल्या वादातून शेजाऱ्याने शेजाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. फारुख शेख आणि आसिफ शेख अशी हल्ला करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी दोघांविरोधात धारावी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांना दोघा आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद वाजिद शेख आणि मोहम्मद साजिद शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.

पाणी भरण्यावरुन शेजारणींमध्ये वाद झाला होता

धारावीमध्ये दररोज संध्याकाळच्या सुमारास पाणी येते. यावेळी पाणी भरण्यावरुन दोन शेजारणींमध्ये शनिवारी भांडण झाले. गव्हर्नर चाळच्या प्लॉट क्रमांक 21 मध्ये शनिवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास नसरीन बानो आणि तिची शेजारीण राबिया शेख भांडण झाले. भांडण इतके वाढले की, दोन्ही महिलांचे कुटुंबीयही भांडणात सामील झाले. यानंतर काही वेळाने भांडण मिटले.

भांडणानंतर बदल्याच्या हेतून शेजाऱ्यावर हल्ला

भांडण जरी मिटले असले तरी मनातील राग मात्र शांत झाला नव्हता. याच भांडणातून एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबाचा काटा काढण्याचा कट रचला. एका कुटुंबातील मोहम्मद वाजिद शेख आणि मोहम्मद साजिद शेख यांनी दुसऱ्या कुटुंबातील फारुख शेख आणि त्याचा चुलत भाऊ आसिफ शेख यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा कट रचला. त्यानुसार साजिदने फारुखच्या पोटात वार केला, तर वाजिदने आसिफच्या छातीत जीवघेणा वार केला. दोघांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित