AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara Crime : भांडण लहान मुलांचे अन् मारामारी मोठ्यांची, साताऱ्यात नेमकं काय घडलं?

लहान मुलांच्या किरकोळ भांडणाने भीषण स्वरुप घेतले आणि भलतेच घडले. शेजाऱ्यांमधील मारामारीने गावात एकच खळबळ उडाली.

Satara Crime : भांडण लहान मुलांचे अन् मारामारी मोठ्यांची, साताऱ्यात नेमकं काय घडलं?
साताऱ्यात किरकोळ वादातून मायलेकीला मारहाणImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 25, 2023 | 10:03 AM
Share

सातारा / 25 जुलै 2023 : साताऱ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लहान मुलांच्या भांडणातून मायलेकीला बेदम मारहाण केल्याची घटना फलटण तालुक्यातील मौजे कुरवली खुर्द येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ तोडकर आणि विनोद तोडकर अशी आरोपी पिता-पुत्राची नावे आहेत. क्षुल्लक कारणातून झालेल्या या हाणामारीमुळे गावात खळबळ उडाली आहे. पीडित आणि आरोपी एकमेकांचे शेजारी आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

आरोपी आणि पीडित हे शेजारी आहेत. यामुळे आरोपीचा लहान मुलगा आणि पीडितेची लहान मुलगी यांची मैत्री आहे. दोघेही दररोज एकत्र खेळतात. नेहमीप्रमाणे दोघं एकत्र खेळत असताना दोघांमध्ये खेळण्यावरुन वाद झाला. यानंतर दोघांची आई वाद सोडवायला आली असता दोघींमध्ये वादावादी झाली. यात पीडित महिलेची मोठी मुलगीही मध्ये पडली. मग आरोपी पिता-पुत्राने वादात उडी घेतली.

यानंतर वाद मिटण्याऐवजी वाद वाढत गेला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी पिता-पुत्राने पीडित मायलेकींना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर पीडित मायलेकींनी फलटण पोलीस ठाणे गाठत पिता-पुत्राविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करत पुढील कारवाई सुरु केली आहे.

पीडित महिला विधवा असून, ती आपल्या दोन मुलींसह राहते. मोलमजुरी करुन महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. दरमया, क्षुल्लक कारणातून मालयलेकींना मारहाण केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.