AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते’ 10 सवाल ज्याचा भडिमार NIA वाझेंवर करणार?; मिळतील उत्तरं?

सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (NIA can ask sachin vaze this 10 question in Ambani bomb scare case )

'ते' 10 सवाल ज्याचा भडिमार NIA वाझेंवर करणार?; मिळतील उत्तरं?
25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर स्फोटके मिळाल्याचे समजल्यानंतर एटीएसचे पथक त्याठिकाणी पोहोचले. तेव्हा एटीएसच्या अधिकाऱ्याने स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कुठे आहे, असा प्रश्न सचिन वाझे यांना विचारला. त्यावेळी सचिन वाझे सँडविच खात उभे होते.
| Updated on: Mar 14, 2021 | 5:55 PM
Share

मुंबई: सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता या दहा दिवसात अंबानी याच्या घरासमोर ठेवण्यात आलेल्या स्फोटकाच्या गाडीपासून ते मनसुख हिरेन मृत्यूपर्यंतच्या प्रश्नांचा भडिमार वाझेंवर होणार आहे. त्यामुळे वाझे या प्रश्नांची उत्तर देणारं का? एनआयएला सर्व उत्तरे मिळतील का? काय असतील हे प्रश्न याचा घेतलेला हा आढावा. (NIA can ask sachin vaze this 10 question in Ambani bomb scare case )

सचिन वाझे यांची परवा 12 मार्च रोजी दहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर काल 13 मार्च रोजी वाझे यांची 13 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा एनआयएने त्यांना अटक केली. आज दुपारी त्यांना विशेष एनआयए न्यायालयात आणण्यात आले. यावेळी त्यांना 10 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. वाझे यांनी काही प्रमाणात गुन्हे कबुल केले असून आणखी काही प्रकरणात त्यांची चौकशी करायची असल्याचं सांगून एनआयएने त्यांची कोठडी मागितली होती. त्यामुळे आता वाझे यांची तब्बल दहा दिवस चौकशी होणार असून त्यातून नवनवीन गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.

काझी यांची चौकशी

दरम्यान, वाझे यांचे सहकारी एपीआय रियाज काझी यांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. सकाळपासूनच काझी यांची चौकशी सुरू आहे. गेल्या पाच तासांपासून काझी यांची चौकशी सुरू आहे. त्यातूनही एनआयएला महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काझी यांचा जबाब घेतल्यानंतर एक दोन दिवसात काझी आणि वाझे यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं.

वाझे निलंबित

दरम्यान, वाझे यांना अटक केल्यानंतर दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. नियमानुसार सरकारी नोकर 48 तास पोलिसांच्या अटकेत असेल तर त्याला निलंबित करण्यात येते. वाझे यांना आता दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

या संभाव्य दहा प्रश्नांचा भडिमार होणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझेंवर दहा प्रश्नांचा भडिमार होणार आहे. यात अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांपर्यंत ते हिरेन यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रश्नांचा समावेश असेल. ही केवळ संभाव्य प्रश्नांची यादी आहे. ही अधिकृत यादी नसून त्याला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

1) अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कुठून आली? त्यात वाझेंचा रोल काय? नंबर प्लेटचं गौडबंगाल काय?

2) स्फोटकांनी भरलेली कार हिरेन मनसुख यांची होती. ती कार वाझे का वापरत होते?

3) मनसुख हिरेन यांच्याशी काय संबंध होते? त्यांच्याशी काही व्यवहार झाला होता का?

4) विमला हिरेन यांच्या दाव्यानुसार तीन दिवस हिरेन वाझेंसोबत होते. या तीन दिवसात वाझे हिरेन यांना कुठे घेऊन गेले? या तीन दिवसांत दोघांमध्ये काय चर्चा झाली?

5) हिरेन यांचा मृत्यू झाला त्या दिवशी वाझे कुठे होते? हिरेन यांनी तीन दिवसात आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं का?

6) अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी कशी केली? तपासात काय तथ्य आढळलं? पुरावे काय मिळाले?

7) जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेचा तपास केला का? या तपासात काय पुरावे मिळाले? ही दशतवादी संघटना अस्तित्वात आहे का?

8) धनंजय गावडे यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? असेल तर तो कसा?

9) हिरेन यांना अटक होण्याचा सल्ला का दिला? हिरेन दोषी होते तर त्यांना जामिनावर सोडून देतो असं का सांगितलं?

10) या संपूर्ण प्रकरणात कुणाकुणाचा सहभाग आहे? बड्या असामींचा या प्रकरणाशी संबंध आहे का? या सर्व प्रकरणामागचा हेतू काय? (NIA can ask sachin vaze this 10 question in Ambani bomb scare case )

संबंधित बातम्या:

जे कोरोना काळात कमावलं, ते राठोड, वाझे प्रकरणात ठाकरेंनी गमावलं? वाचा सविस्तर

Sachin Vaze Arrested Updates : सचिन वाझे यांचं दुसऱ्यांदा निलंबन

वाझेंना पोलीस दलात घेण्याचा शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

(NIA can ask sachin vaze this 10 question in Ambani bomb scare case )

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.