अपघात इतका भीषण की चक्क गॅस कटर, जेसीबीने काढावा लागला मृतदेह; पिकअप अन् ट्रकची टक्कर, एकाचा जागीच मृत्यू

| Updated on: Nov 29, 2021 | 11:03 AM

कांद्याचे रोप घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीची मालवाहतूक ट्रकला समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या भीषण अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण की चक्क गॅस कटर, जेसीबीने काढावा लागला मृतदेह; पिकअप अन् ट्रकची टक्कर, एकाचा जागीच मृत्यू
येवला तालुक्यात ट्रक आणि पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला.
Follow us on

लासलगावः कांद्याचे रोप घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीची मालवाहतूक ट्रकला समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या भीषण अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना येवला तालुक्यातील येवला-मनमाड रोडवरील गोपाळवाडी शिवारात घडली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की, पिकअप चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटर आणि जेसीबी मशीनची मदत घेण्यात आली.

मृतदेह काढायला अर्धा तास लागला

रात्री 10 वाजेच्या सुमारास येवला-मनमाड रोडवरून मनमाडच्या दिशेने कांद्याचे रोप घेऊन पिकअप गाडी जात होती, तर मालवाहतूक ट्रक हा येवल्याच्या दिशेने जात होता. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या नादात येवला तालुक्यातील गोपाळवाडी शिवारात पिकअप गाडी आणि मालवाहतूक ट्रकची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की यात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला. गॅस कटर आणि जेसीबी मशीनच्या सहाय्याने अथक प्रयत्नानंतर अर्ध्या तासानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

चेहरा छिन्नविछिन्न

अपघातात पिकअप चालकाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मृतदेहाची ओळख अद्यापही पटली नाही. त्यामुळे गाडीच्या नंबर प्लेटवरून चालकाची ओळख पटविण्याचे काम येवला तालुका पोलीस करत आहेत. या अपघातानंतर मालवाहतूक ट्रक चालक फरार झाला आहे. या अपघातप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक अनिल भवरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.

वाहनांच्या लांबच लांब रागा

अपघातनंतर या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मृतदेह काढल्यानंतर वाहतूक सुरळीत करायला पोलिसांना बराच वेळ गेला. शिवसेना नेते संभाजी पवार यांनी यावेळी मोठी मदत केली. पिकअप चालकाचा मृतदेह गाडी बाहेर काढण्यासाठी त्यांनी गॅस कटर आणि जेसीबी मशीन तातडीने उपलब्ध करून दिली. त्यामुळे घटनास्थळावरील वाहतूक कोंडीही लवकर सुरळीत करण्यात मदत झाली.

इतर बातम्याः

VIDEO | हा व्हिडीओ पाहून तुमचं काळीज तीळ-तीळ तुटेल, लेकरु ओरडतंय ‘पप्पा जाऊ द्या’, नराधम बापाची लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण

महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षे झाली, पण अनेकांना डायजेस्ट होत नाही; भुजबळांचा विरोधकांना टोला, मुख्यमंत्री बघेलांचा समता पुरस्काराने गौरव

साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील 50 ग्रंथाचे प्रकाशन; 26 ग्रंथ मराठी, 14 ग्रंथ इंग्रजी आणि 10 ग्रंथ हिंदी भाषेत