AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रॉंग साईडला गाडी वळवताना दुचाकी कंटेनरखाली घुसली, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

विनित पोरंटला आणि पवन नामपल्ली हे दुचाकीवरुन अक्कलकोटहून सोलापूरकडे चालले होते. यावेळी सोलापूर-अक्कलकोट रोडवर एक कंटेनर राँग साईडने गाडी वळवत होता. तितक्यात भरधाव दुचाकी आली आणि कंटेनरला धडकली.

रॉंग साईडला गाडी वळवताना दुचाकी कंटेनरखाली घुसली, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
कंटेनर आणि दुचाकी अपघातात एक ठारImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 24, 2023 | 8:31 PM
Share

सोलापूर / सागर सुरवसे : कंटेनर चालक राँग साईडने गाडी वळवत असताना समोरुन आलेली भरधाव दुचाकी कंटेनरखाली गेल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सोलापूर-अक्कलकोट रोडवर हा अपघात घडला. विनित पोरंटला असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. पवन नामपल्ली असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंटेनर चालक राँग साईडने गाडी वळवत असताना दुचाकी धडकली

विनित पोरंटला आणि पवन नामपल्ली हे दुचाकीवरुन अक्कलकोटहून सोलापूरकडे चालले होते. यावेळी सोलापूर-अक्कलकोट रोडवर एक कंटेनर राँग साईडने गाडी वळवत होता. तितक्यात भरधाव दुचाकी आली आणि कंटेनरला धडकली. धडक झाल्यानंतर दुचाकी थेट कंटनेरखाली घुसली. या अपघातात दुचाकीवरील विनितचा जागीच मृत्यू झाला तर पवन गंभीर जखमी झाला.

घटना सीसीटीव्हीत कैद

अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुननगर जवळील टाटा शोरूम समोर ही घटना घडली. ही सर्व घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. भादवी कलम 304, 287, 337, 338 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी कंटेनर चालक फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, असे वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी सांगितले.

भंडाऱ्यात ट्रॅक्टर नदीत कोसळून एक ठार

शेतमाल घेऊन जाणारा ट्रॅक्टर 30 फूट खाली नदीत कोसळून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरवरील एकजण जागीच ठार झाला. अन्य दोन गंभीर जखमी झाले. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथे पवनी-लाखांदूर मार्गावरील शिव मंदिरजवळील पुलावर हा अपघात घडला. अण्णा पारधी असे मयत व्यक्तीचे नाव आहे. राष्ट्रपाल ठाकरे आणि राधेश्याम ढोरे अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच