Osmanabad | मलकापूरचे एकनाथ लोमटे महाराजांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल, मठात आलेल्या महिलेवर अतिप्रसंग? येरमाळा पोलिसात तक्रार

या प्रकरणी कलम 354,354 अ, 341,323,504 व 506 नुसार येरमाळा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Osmanabad | मलकापूरचे एकनाथ लोमटे महाराजांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल, मठात  आलेल्या महिलेवर अतिप्रसंग? येरमाळा पोलिसात तक्रार
मलकापूरचे महाराज एकनाथ सुभाष लोमटेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 2:28 PM

उस्मानाबादः राज्यभरात मोठं प्रस्थ असलेले मलकापूरचे (Malkapur) एकनाथ सुभाष लोमटे (Eknath Subhash Lomte) महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराजांच्या दर्शनासाठी मठात आलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. 28 जुलै रोजी सदर महिला मठात दर्शनासाठी आली असता महाराजांनी तिचा विनयभंग केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच मागील वेळी तू दर्शनासाठी आली होती तेव्हा तुझ्यावर बलात्कार केला होता. त्याची व्हिडिओ क्लिपही (Video Clip) माझ्याकडे असल्याची धमकी महाराजांनी दिली. तसेच ही क्लिप व्हायरल होऊ द्यायची नसेल तर तुला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी धमकी दिली. सदर प्रकाराला महिलेने तीव्र विरोध केला असता महाराजांनी तिच्या अंगावर हात टाकत शिवीगाळही केल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. यावेळी आरडाओरड केल्यानंतर शिष्यांची गर्दी जमा झाली, त्यानंतर महाराजांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ लोमटे महाराजांविरोधात याआधीदेखील फसवणुकीच्या तक्रारी आल्याची माहिती समोर आली आहे.

महिलेची तक्रार काय?

सदर प्रकरणी महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, ती 28 जुलै रोजी दुपारच्या वेळी एकनाथ सुभाष लोमटे महाराजांच्या दर्शनासाठी मलकापूर येथील मठात गेली होती. तेथे भक्तांच्या जेवणाचा कार्यक्रम सुरु होता. त्यामुळे ती इमारतीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाखाली बसली. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महाराजाचा शिष्य अशोक याने सांगितले, महाराज समोरच्या रुममध्ये बसले आहेत. तुम्हाला आत बोलावलं आहे. रुममध्ये गेल्यावर , तिथे महाराज एकटेच होते. त्यावेळी त्यांनी तुला माझ्यासोबत शारीरीक संबंध ठेवावे लागतील, असे म्हटले. तसेच मागील वेळी प्रसादातून तुला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तुझ्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे असून तो व्हायरल करण्याची धमकीही दिली. याविरोधात आरडाओरडा केल्यानंतर महाराजांनी पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार महिलेने केली.

महाराजांविरोधात गुन्हा

महिलेने आरडाओरडा केल्यानंतर मठात भक्तांची गर्दी जमली. मात्र गर्दीतून महाराजांनी पळ काढला. या प्रकरणी कलम 354,354 अ, 341,323,504 व 506 नुसार येरमाळा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महाराजांविरोधात आधीदेखील अनेक फुसवणुकीच्या तक्रारी आहेत. मात्र राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्याविरोधात फार कारवाया झालेल्या नाहीत.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.