AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 वेळा पाकची वारी, ज्योती मल्होत्राशी कनेक्शन, हेरगिरीत आता थेट मंत्र्यांचा पीएला बेड्या,…

गुप्तचर यंत्रणेने आरोपी शकूर खान याच्यासह जयपूर मुख्यालयात धाड टाकली. तेथे त्याची कसून चौकशी करण्यात आली. आरोपीने येथून पाकिस्तानला कोणती माहिती पाठवली आहे, त्याचे पाकिस्तानात कोणा-कोणाशी संबंध आहेत याचा एजन्सी शोध घेत आहे.

7 वेळा पाकची वारी, ज्योती मल्होत्राशी कनेक्शन, हेरगिरीत आता थेट मंत्र्यांचा पीएला बेड्या,…
| Updated on: Jun 01, 2025 | 9:54 PM
Share

पाकिस्तानशी हेरगिरी केल्या प्रकरणात राजस्थान – जैसलमेर जिल्ह्यातील जिल्हा रोजगार अधिकारी शकूर खान याला अटक झाली आहे. शकूर खान हा काँग्रेसच्या काळात कॅबिनेट मंत्र्यांचा पीए होता. त्याच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानच्या अनेक मोबाईल क्रमांक सापडले आहेत. या क्रमांकावर अनेक कॉल केले गेले आहेत. शकुरचे ज्योती मल्होत्रा हिच्याशी देखील संबंध होते असे उघडकीस आले आहे.

देशात भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर हेरगिरीची एकामागून एक प्रकरणे बाहेर पडत आहेत. आता राजस्थानच्या जैसलमैरचे सध्याचे जिल्हा रोजगार अधिकारी शकूर खान याला अटक केली आहे. शकूर खान कांग्रेस सरकारमधील कॅबिनेट मंत्री शाले मोहम्मद यांचा खासगी सचिव होता, गेल्या काही वर्षांपासून त्याने सात वेळा पाकिस्तानचा प्रवास केला आहे. तो पाक दुतावासाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता.शकूरचे कनेक्शन हिस्सार येथून जेरबंद झालेल्या युट्युबर ज्योती मल्होत्रा हीच्याशी असल्याचे उघडकीस आले आहे.

भारतीय तपास यंत्रणांनी शकूर याच्या मोबाईलमधून अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. शकूर देशाचे गोपनीय कागदपत्रे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानमध्ये बसलेल्या एका हँडलरला पाठवत होता असा गुप्तचर यंत्रणांना संशय आहे. पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये सुमारे एक डझन पाकिस्तानींचे मोबाईल नंबर सापडले आहेत. तो या नंबरवर कागदपत्रे आणि गुप्त माहीती पाठवत असे. पोलिसांनी त्यात काही कागदपत्रे जप्त केली आहेत, तर मोबाईल फोनमधून डिलीट केलेला डाटा पुन्हा मिळवण्यासाठी तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे.

चौकशीत गुंतलेल्या तपास यंत्रणा

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पाकिस्तानने देशातील महत्त्वाच्या ठिकाणी हेरगिरी वाढवली आहे. त्यामुळे अनेक युट्युबर आणि नोकरदार आयबीच्या निशाण्यावर आले आहेत. नुकताच नेव्ही डॉकयार्डमधून एका इंजिनिअरला अटक झाली आहे. आता गुप्तचर पथकाने जैसलमेरमधील रोजगार विभागातील सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ( एएओ ) आणि काँग्रेसचे माजी मंत्री शाले मोहम्मद यांचे वैयक्तिक सहाय्यक शकूर खान याला अटक केली आहे.

१९ ते २३ तारखेपर्यंत तो मंत्र्यांचा पीएस होता.

शकूर खान याचे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिमयार खान, सक्कर, घोटकी इत्यादी भागातील नागरिकांचे जवळचे संबंध आहेत.तो वारंवार पाकिस्तानात प्रवास केला आहे. २००९ ते २०१३ पर्यंत पोखरणचे आमदार शाले मोहम्मद यांचा तर २०१९ ते २०२३ पर्यंत राजस्थान सरकारचे कॅबिनेट मंत्र्यांचा वैयक्तिक सचिव होता. शाले मोहम्मद यांची टर्म संपल्यानंतर तो जिल्हा रोजगार अधिकारी या मूळ पदावर परतला होता.

त्यामुळे एजन्सींना संशय आला..

आरोपी शकूर खान पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात होता. तपास यंत्रणांनी त्याचे संभाषण अनेक वेळा ट्रॅप केले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानचे डझनभर नंबर देखील सापडले आहेत. शकूरचे हरियाणाच्या हिसार येथील ज्योती मल्होत्रा ​​हीच्याशीही घनिष्ट संबंध होते. शकूर जैसलमेर जिल्ह्यातील बडोदा गावातील मंगलिया की धानी येथील रहिवासी आहे.काँग्रेस नेते आणि माजी मंत्री शाले मोहम्मद यांच्याशीही घनिष्ट संबंध आहेत. पोलिस त्याच्या बँक खात्यांचीही तपासणी करीत आहेत

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....