Arpita Mukherjee : अर्पिता मुखर्जीकडे सापडलेले 50 कोटी कुणाचे? प्रकरणात नवं ट्विस्ट, माजी मंत्री पार्थ चॅटर्जी म्हणतात…

गाडीतून खाली उतरल्यावर पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले की वसुली करताना मिळालेले पैसे माझे नाहीत. आपल्या विरोधात काही षडयंत्र आहे का? असे विचारले असता, वेळ आल्यावर तुम्हाला कळेल, असे त्यांनी सांगितले.

Arpita Mukherjee : अर्पिता मुखर्जीकडे सापडलेले 50 कोटी कुणाचे? प्रकरणात नवं ट्विस्ट, माजी मंत्री पार्थ चॅटर्जी म्हणतात...
अर्पिता मुखर्जीकडे सापडलेले 50 कोटी कुणाचे? प्रकरणात नवं ट्विस्ट, माजी मंत्री पार्थ चॅटर्जी म्हणतात...
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

|

Jul 31, 2022 | 4:21 PM

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात (West Bengal Education Fruad) अटक करण्यात आलेले माजी मंत्री पार्थ चॅटर्जी (Parth Chaterjee) यांनी रविवारी दावा केला की ईडीच्या छाप्यांमध्ये जप्त केलेले पैसे आपले नाहीत. आपल्या विरोधात कोण षडयंत्र रचत आहे हे येणारा काळच सांगेल असेही ते म्हणाले. याआधी पार्थ चॅटर्जींची सहकारी अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) हिने ही रोकड पार्थ चॅटर्जींची असल्याचे सांगितले होते. या दोघांनीही नकार दिल्यानंतर आता छाप्यात सापडलेली मालमत्ता कोणाची? हा मोठा प्रश्न केंद्रीय यंत्रणेसमोर आहे. पार्थ चॅटर्जींना रविवारी जोकाच्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. गाडीतून खाली उतरल्यावर पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले की वसुली करताना मिळालेले पैसे माझे नाहीत. आपल्या विरोधात काही षडयंत्र आहे का? असे विचारले असता, वेळ आल्यावर तुम्हाला कळेल, असे त्यांनी सांगितले.

पक्षाच्या सर्व पदावरून काढून टाकलं

चॅटर्जी यांनीही शुक्रवारी दावा केला होता की ते एका षड्यंत्राचा बळी आहेत आणि तृणमूल काँग्रेसच्या निलंबनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. मला निलंबित करण्याच्या या निर्णयामुळे निष्पक्ष तपासावर परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले होते. दुसरीकडे पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिपदावरून हटवण्याच्या निर्णयावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यांना सर्वपक्षीय पदांवरून हटवण्यात आले. तृणमूल काँग्रेसचे राज्य सरचिटणीस कुणाल घोष यांनी गुरुवारी या घोटाळ्याशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते.

ईडीकडूनही चौकशी सुरूच

कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पश्चिम बंगाल शालेय सेवा आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) गट-क आणि डी कर्मचाऱ्यांच्या तसेच शिक्षकांच्या भरतीतील कथित अनियमिततेची चौकशी करत आहे. त्याच वेळी ईडी या घोटाळ्यात सामील असलेल्या मनी ट्रेलची चौकशी करत आहे. या घोटाळ्याशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे नल घोष यांनी गुरुवारी सांगितले होते.

आतापर्यंत किती पैसा सापडला?

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने पार्थ चॅटर्जीशी संबंधित सुमारे 17 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. डझनहून अधिक नवीन ठिकाणी छापे टाकण्याची तयारी सुरू आहे. डायमंड सिटी फ्लॅटवर 22 जुलै रोजी छापा टाकण्यात आला होता. 27 जुलै रोजी बेलघोरियातील दोन फ्लॅटवर छापे टाकण्यात आले होते आणि चिनार पार्कमधील फ्लॅटवर 28 जुलै रोजी ईडीने छापा टाकला होता. आतापर्यंत ईडीने अर्पिताच्या चार फ्लॅटवर छापे टाकले आहेत. अर्पिता मुखर्जीच्या घरावरील पहिल्या छाप्यात 22 कोटी 70 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले, तर दुसऱ्या छाप्यात सुमारे 28 कोटी रोकड आणि 4 कोटींचे सोने जप्त करण्यात आले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें