video | सीएनजी भरण्यावरुन वाद, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला रिक्षाचालकाची मारहाण, घटना CCTVमध्ये कैद
विरार येथीलल पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यावरून मोठाच वाद झाला आहे. येथे एका रिक्षाचलकाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला माराहण केली. तसेच शिवराळ भाषेचाही वापर केला. सीएनजी भरण्यासाठी लावण्यात आलेल्या रांगेच्या वादातून हा प्रकार घडला आहे.

पालघर : विरार येथीलल पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यावरून मोठाच वाद झाला आहे. येथे एका रिक्षाचलकाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला माराहण केली. तसेच शिवराळ भाषेचाही वापर केला. सीएनजी भरण्यासाठी लावण्यात आलेल्या रांगेच्या वादातून हा प्रकार घडला आहे. रिक्षाचलाक तसेच त्याच्या पत्नीची दादागिरी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विरार पूर्व साईनाथ नगर येथील जॉन अँड सन्स या पेट्रोल पंपावर आज सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली. कुणाल पिल्ले असे मारहाण झालेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचे नाव आहे. (petrol pump worker beaten by rickshaw driver and his wife in vasai palghar district)
रिक्षाचालक तसेच पत्नीविरोधात अदखलपात्र गुन्हा
मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार नालासोपारा शहरात सीएनजी असणारा एकमेव पेट्रोल पंप विरारमध्ये आहे. त्यामुळे पहाटे 4 पासूनच याठिकाणी वाहनधारकांच्या सीएनजी साठी रांगा लागतात. आजही त्याचप्रमाणे रांगा लागल्या होत्या. यावेळी एक अनोळखी रिक्षाचालक सकाळी 7 च्या सुमारास सीएनजी भरण्यासाठी आला होता. त्याने सीएनजीच्या भरण्यावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा माणूस 3 तासानंतर त्याच्या पत्नीला घेऊन आला. तसेच पुन्हा दादागिरी करत पेट्रोल पंपावरील चालकास मारहाण केली.
पााहा व्हिडीओ :
रिक्षाचालकावर योग्य ती कारवाई करावी
दरम्यान, वाहनांच्या रांगा लावताना किरळोळ वादावरुन रिक्षाचालक आणि त्याच्या पत्नीने कर्मचाऱ्याला धक्काबुकी केल्यामुळे पोलिसांनी योग्य कारवाई करावी अशी मागणी पेट्रोल पंपावरील इतर कर्मचाऱ्यांनी केली. विरार पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालक आणि त्याच्या पत्नी विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.
इतर बातम्या :
जामिनावर सुटताच तुफान गोळीबार, हत्येच्या आरोपातील तरुणाचा सिनेस्टाईल खून, जळगाव हादरलं
कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यास मागता येईल दाद; पोलिसांविरुद्धच्या तक्रारीसाठी नाशिकमध्ये प्राधिकरण
(petrol pump worker beaten by rickshaw driver and his wife in vasai palghar district)