पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यालय पोलिसांकडून सील, या शहरात केली कारवाई…

देशात दहशतवादी कारवायांबरोबरच रसद पुरवण्याच्या आरोप असलेली संघटनेचे मालेगाव येथील टेन्शन चौकातील कार्यालय सील करण्यात आले आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यालय पोलिसांकडून सील, या शहरात केली कारवाई...
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 7:25 PM

मालेगाव, नाशिक : देशाच्या गृहविभागाने पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर पाच वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर देशातील पीएफआय संघटनेची सर्वच कार्यालये सील करण्याचे आदेश काढत त्या संस्थेला मिळणारा निधी गोठवण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार राज्यातील पोलीस (Police) दलाने या कारवाईला सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात असलेले कार्यालय सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलीसच्या मालेगाव (Malegaon) विभागाने ही कारवाई केली असून त्याबाबतचा अहवाल गृह विभागाला पाठविण्यात येणार आहे.

देशात दहशतवादी कारवायांबरोबरच रसद पुरवण्याच्या आरोप असलेली संघटनेचे मालेगाव येथील टेन्शन चौकातील कार्यालय सील करण्यात आले आहे.

अप्पर पोलीस अधिक्षक असलेले चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाली ही कार्यालय सीलची कारवाई करण्यात आली आहे.

कार्यालय सील करण्यापूर्वी कार्यालयातील कागदपत्रे तपासण्यात आली असून प्रचार साहित्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

पीएफआयचे कार्यालय सील करत असतांना आणि त्यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वच कारवाईचे चित्रीकरण करण्यात आले असून इतर सदस्यांवर पोलिसांची नजर आहे.

अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्यासोबत ही कारवाई करत असतांना पोलीस निरीक्षक सुरेश घुसर, अशोक रत्नपारखी यांचा पथकाचा सहभाग होता.

देशविघातक प्रचार आणि जातीय तेढ निर्माण करणे, समाजविघातक कार्य यांसह गंभीर आरोप असलेल्या संघटनेच्या प्रमुखासह 03 सदस्यांना एनआयए आणि एलसीबी ने अटकेची कारवाई केली आहे.

एकूणच केंद्रीय गृहविभागाने दिलेल्या आदेशाचे पालन राज्यातील गृह विभागाने करण्यास सुरुवात केली असून राज्यातील इतर शहरांमध्ये जिथे-जिथे पीएफआयचे कार्यालय आहे तिथे कार्यालय सीलची कारवाई केली जाणार आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.