AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Phaltan Doctor Death Case : ‘ती हॉटेलला गेली, तिथून तिने रात्रभर प्रशांतला…’, फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा मोठा गौप्यस्फोट

Phaltan Doctor Death Case : "पोलीस म्हणून काम केलं असलं तरी पोलीस त्याचा आरोपी म्हणूनच तपास करत आहेत. दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सीडीआर आणि फॉरेन्सिक अहवालाच्या अनुषंगाने कारवाई होईल. पारदर्शकपणेच कारवाई होईल. आमचंही त्याकडे लक्ष आहे. रोज आम्ही अपडेट घेत आहोत. सूचनाही करत आहोत" असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Phaltan Doctor Death Case : 'ती हॉटेलला गेली, तिथून तिने रात्रभर प्रशांतला...', फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा मोठा गौप्यस्फोट
Phaltan Doctor Death Case
| Edited By: | Updated on: Dec 19, 2025 | 11:58 AM
Share

“आयसी कमिटी कार्यरत आहे. आयसी कमिटीकडे डॉक्टराची तक्रार नव्हती. पोलीस आणि डॉक्टरांची एकमेकांविरोधातील तक्रार होती. चौकशी समितीने ही तक्रार निकाली काढली होती. पोलिसांची फिट अनफिटची तक्रार होती. पेशंटला उशिरा तपासण्याची पोलिसांची तक्रार होती, तर रात्रीच्यावेळी पेशंट आणले जातात. अनफिट केलं जातं असं या डॉक्टर महिलेची तक्रार होती” अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात त्या बोलत होत्या. “तीनवेळा बदली करण्यात येत होती. पण या डॉक्टर महिलेने फलटणच हवंय म्हणून सांगितलं होतं. पोलिसांनी सीडीआर काढला. गोपाल बदनेशी जानेवारी ते मार्चपर्यंत संवाद झाला. त्यानंतर संवाद नाही. प्रशांत बनकर सोबत संवाद होता. लक्ष्मीपूजनाला डॉक्टर महिला प्रशांत बनकरच्या घरी दिवाळीसाठी गेल्या. फोटो काढण्यावरून मोठा वाद झाला. भांडण झालं. त्यानंतर त्या घरातून निघाल्या” अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.

“बनकरच्या वडिलांनी तिला समजावलं. त्यानंतर ती हॉटेलला गेली. तिने रात्रभर प्रशांतला मेसेज केले. त्याचा फोन बंद होता. मी आत्महत्या करेल वगैरे मेसेज केले होते. यापूर्वीही तू आत्महत्येची धमकी दिली होती, असं प्रशांतने तिला म्हटलं होतं” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. “आज किंवा उद्या पीएम रिपोर्ट येईल. पण ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोपाळ बदने आणि महिलेचं लोकेशन एकत्र आहे का ते चेक केलं जाईल. लोकेशन सापडल्यावर कारवाई होईल. पोलीसही बदनेकडून माहिती घेत आहेत” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

डॉक्टरांची पहिली तक्रार

“पीएम रिपोर्ट आहे, सीडीआर आहे आणि फॉरेन्सिक अहवाल आहे. सीडीआर रिपोर्ट तिघांचा आहे. अजून कुणाचा आहे का बघण्यात येईल. डॉक्टरांची पहिली तक्रार आहे. पण जनरल डायरी करताना मे महिन्यातील रेकॉर्ड पोलिसांनी नमूद केलं आहे. महिला डॉक्टरची जुलैमधील आहे” असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.  सध्या राज्यभरात महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे.

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...