फक्त सोनं आणि चांदीवरच डल्ला, धूम स्टाईल चोरी करून पळणारी KTM गँग जेरबंद

धूमस्टाईल चोरी करून पळून जाणाऱ्या KTM गँगला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालं. या टोळीतील पाच चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

फक्त सोनं आणि चांदीवरच डल्ला, धूम स्टाईल चोरी करून पळणारी KTM गँग जेरबंद
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 2:49 PM

संतोष नलावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सातारा | 14 नोव्हेंबर 2023 : शहरात सध्या चोऱ्या-माऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पोलिसांच्या वाढत्या गस्तीनंतरही गुन्हेगारांचा हैदोस सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून धूमस्टाईल चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांच्या टोळीनेही धूमाकूळ माजवला होता. त्यामुळे सामान्य नागरिक अक्षरश: जीव मुठीत धरून जगत होते. अखेर नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. धूमस्टाईल चोरी करून पळून जाणाऱ्या KTM गँगला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

या टोळीतील पाच चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील 3 आरोपी पुण्यातल्या मुळशीचे असल्याचं सांगण्यात आलं आहे. सातारा पोलीसांनी इतिहासातली सर्वात मोठी कारवाई केली असुन यात तब्बल 1 किलो सोनं आणि 5 किलो चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. हस्तगत केलेल्या मालामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांशिवाय एक KTM बाईक तसेच गुन्ह्यासाठीत वापरण्यात आलेली हत्यारं सुद्धा जप्त करण्यात आली आहेत.

गाडीतून येणारे हे चोरटे बंद घर हेरून त्यात घरफोडी करयाचे आणि माल घेऊन फरार व्हायते. मात्र सातारा पोलीसांनी मोठ्या शिताफिनं यांना ताब्यात घेऊन हा मुद्देमाल हस्तगत केला. आता पर्यंतची ही साताऱ्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

फक्त महाराष्ट्रातच नव्हे इतर राज्यातंही चोरट्यांचा धूमाकूळ

सातारा पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करत सापळा रचून या पाचही चोरांच्या मुसक्या आवळल्याची माहिती समोर आली आहे. या चोरट्यांच्या गँगने सातारा जिल्ह्यातील मेढा,मल्हारपेठ,वाई,सातारा तालुका,बोरगाव,खंडाळा,शिरवळ,भुईंज,वाठार,उंब्रज आणि वडुज या भागातील 27 हून अधिक ठिकाणी घरफोडी करत ऐवज पळवला. खुद्द आरोपींनीच त्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिली.

एवढेच नव्हे तर या चोरट्यांनी सातारा,पुणे,अहमदनगर,कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातही हैदोस घातला. त्यांच्या चोरीचे क्षेत्र फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नव्हे तर त्यांनी गुजरात आणि कर्नाटकमध्ये जाऊनही अनेक ठिकाणी चोरी केल्याची माहिती देखील समोर आली आहे.

पोलिसांनी या आरोपींकडून तब्बल 70 लाख 4 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये 103 तोळं सोने,5 किलो चांदी आणि चोरीची एक बाईक अशा मालाचा समावेश आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे सामान्य नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला.

रस्त्यावर चालू दुचाकीमध्ये सापडला साप, उडाली एकच खळबळ

दरम्यान साताऱ्याजवळून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेथे एका चालत्या बाईकमध्येच घोणस जातीचा साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्याने कोणालाही इजा केली नाही. तब्बल अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनतर, अखेर पेट्रोल ओतल्यावर तो साप बाहेर आला आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मांडवे येथील संजय पाटील आणि त्यांचे बंधू दुचाकी घेऊन कामानिमित्त वडूजला निघाले असताना थोड्यावेळाने त्यांच्या बाईकच्या स्विच जवळून घोणस जातीच्या सापाने तोंड वर काढले. बाईकचालकाने वाहनाचा स्पीड अचानक कमी केला आणि बाईक बाजूला थांबवली. त्यानंतर त्यांनी भावाल बाईकमध्ये साप असल्याचे सांगितलं. यानंतर तो साप बाहेर काढण्यासाठी धडपड सुरू झाली.

नक्की काय झालं आहे हे पाहण्यासाठी अनेकजण थांबू लागले आणि ट्राफिक पूर्ण जाम झालं. सुमारे अर्धा तास साप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र साप काही बाहेर येत नव्हता.  शेवटी पेट्रोल ओतल्यावर तो साप बाहेर आला आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.