AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : सात लाखांचे ड्रग्स केले जप्त, पोलिसांच्या धडक कारवाईत चौघांना अटक, मोठे रॅकेट उध्वस्त

शहरातील कोळसेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी मोठी कारवाई करत ड्रग्सची तस्करी करणाऱ्या चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे.

Kalyan Crime : सात लाखांचे ड्रग्स केले जप्त, पोलिसांच्या धडक कारवाईत चौघांना अटक, मोठे रॅकेट उध्वस्त
| Updated on: Sep 11, 2023 | 10:17 AM
Share

कल्याण | 11 सप्टेंबर 2023 : कल्याण व डोंबिवली या शहरांत गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर आली असून अनेक जण या नशेच्या आहारी गेल्याचेही समोर आले. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कंबर कसत नाकाबंदी सुरू केली आणि त्याविरोधात धडक कारवाई सुरू केली. कल्याण कोळसेवाडी आणि खडकपाडा येथील पोलिसांनी एकाच दिवशी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचे ड्रग्स (drugs seized) जप्त केले तसेच या गुन्ह्यातील आरोपींनाही अटक करण्यात (four arrested) त्यांना यश मिळाले.

कल्याण झोन 3 पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करत कारवाई सुरू केली होती. तेव्हाच कल्याण पूर्व येथील १०० फूटी रोडवर नाकाबंदी सुरू असतानाच समोर पोलिसांना पाहूनही एक रिक्षा जोरात पळवली गेली. हे पाहून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्या रिक्षाचा पाठलाग करत ती रोखली. त्या रिक्षातील दोन तरूणांना खाली उतरवून त्यांची झडती घेण्यात आली असता, त्यांच्याकडे ५.६ ग्राम वजन असलेला, सुमारे ३३, ६०० रुपये किमतीचा मादक पदार्थ सापडला. त्यांना पोलिसांनी अटक केली.

कुठून मिळाले अमली पदार्थ ?

त्या तरूणांची कसून चौकशी करण्यात आली असता मोठी माहिती समोर आली. नवी मुंबईतील इमेका या ४२ वर्षीय व्यक्तीकडून हा अमली पदार्थ खरेदी केला असून कल्याण पूर्वेत त्याची विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसा कोळसेवाडी पोलिसांनी नवी मुंबईतील वाशी परिसरातून सदर नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून २७९ ग्राम वजन असलेले सुमारे ५ लाख ५८ हजार रुपये किमतीचा एम डी हा अमली पदार्थही जप्त करण्यात आला. या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली. तेव्हाच खडकपाडा पोलिसानी आंबीवली परिसरात एक कारवाई केली, तेथेही एका या महिलेकडून त्यांनी ३४ ग्राम एम डी जप्त केले. त्यांनी जप्त केलेल्या अमली पदार्थाची बाजारातील किंमत ६८ हजार रुपये इतकी होती. कोळसेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ७ लाखांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कल्याणात प्रथमच इतकी मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.