AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्याच्या छाताडावर बसली, सोबत प्रियकर अन् त्या चार भिंतीच्या खोलीत भयंकर घडलं; अख्खी सांगली हादरली

सध्या सांगली येथील हत्याकांड चांगलेच चर्चेत आहे. बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा झोपेतच काटा काढला आहे. तिने नवऱ्याची हत्या करुन त्याच्या निधनाचा खोटा कट रचला होता. मात्र, पोलिसांना संशय आला. त्यानंतर सत्य ऐकून त्यांना देखील धक्का बसला.

नवऱ्याच्या छाताडावर बसली, सोबत प्रियकर अन् त्या चार भिंतीच्या खोलीत भयंकर घडलं; अख्खी सांगली हादरली
सांकेतिक फोटोImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 28, 2026 | 11:50 AM
Share

देभरात विवाहबाह्य संबंधातून होणाऱ्या हत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार सांगली येथून समोर आला आहे. पतीच्या छाताडावर बसून गळा आवळत प्रियकराच्या मदतीने त्याचा खून करणाऱ्या विवाहितेचा धक्कादायक कट विश्रामबाग पोलिसांनी उघडकीस आणला. घराबाहेर मारहाण झाल्याने पतीचा झोपेत मृत्यू झाल्याचा बनाव रचत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या कसून चौकशीत पत्नीच्या जबाबातील विसंगती समोर आली आणि संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला.

नेमकं काय घडलं?

ही घटना सांगलीतील पोळ मळा परिसरात घडली. दुकानात सेल्समन म्हणून काम करणारे आनंद हणमंत सर्जे वय 28 हे पत्नी व 2 मुलांसह राहत होते. गुरुवारी पहाटे पत्नी आणि मेहुण्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेहावरील गळ्यावरील ओरखडे पाहून विश्रामबाग पोलिसांना संशय आला. त्यानंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव आणि त्यांच्या पथकाने पत्नीची सखोल चौकशी केली. तिच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्यानंतर तपासाची दिशा बदलण्यात आली. प्राथमिक तपासात पती दारूच्या नशेत मारहाण व शिवीगाळ करत असल्याच्या रागातून पत्नीने आपल्या 23 वर्षीय प्रियकरासोबत खुनाचा कट रचल्याचे समोर आले.

कशी केली हत्या?

गुरुवारी पहाटे झालेल्या किरकोळ वादानंतर पत्नीने प्रियकराला घरी बोलावले. दोघांनी मिळून आनंद सर्जे यांचे पाय ओढणीने बांधले आणि त्यांच्या छाताडावर बसून गळा दाबत त्यांचा खून केला. त्यानंतर संशय टाळण्यासाठी पत्नीने भावाला बोलावून घेत पतीला रुग्णालयात नेले. “बाहेर कुणीतरी मारहाण केल्याने ते घरी येऊन झोपले होते,” अशी खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आनंद सर्जे यांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना दोन लहान मुले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

Follow Us
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?
पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर..
Pune : पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खालावली