धक्कादायक, NCP पदाधिकाऱ्याच्या हॉटेलमध्ये कुंटनखाना, बांग्लादेशी महिलांना पकडलं
एक धक्कादायक बाब समोर आली आहे. NCP पदाधिकाऱ्याच्या हॉटेलमध्ये सुरु असलेला कुंटनखाना पोलिसांनी उद्धवस्त केला आहे. पकडलेल्या महिला या बांग्लादेशी आहेत. त्यांच्याकडे मुंबई आणि पुण्याचे आधारकार्ड आढळून आले आहेत.

मागच्या आठवड्यात नाशिकच्या देवळा पोलिसांनी वेलकम हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईतून धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांना येथे कुंटनखाना सुरु असल्याची माहिती मिळालेली. त्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. देवळा पोलिसांनी वेलकम हॉटेलवर छापा टाकून कुंटनखाना उद्ध्वस्त केला. वेलकम हॉटेलमध्ये ज्या महिलांना पकडण्यात आलं, त्या पीडित महिला बांग्लादेशी निघाल्या आहेत. या बांग्लादेशी महिलांकडे मुंबई आणि पुण्याचे आधारकार्ड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वेलकम हॉटेलचा मालक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी निघाला आहे. या प्रकरणात संशयित आरोपी सुनील आहेर उर्फ गोटू आबा फरार आहे. दीपक ठाकरे हॉटेल मॅनेजर देवळा पोलिसांच्या ताब्यात आहे. देवळा पोलिसांकडून आज आणखी दुसरा गुन्हा दाखल केला जाणार.
बांग्लादेशी रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
हॉटेल मालक आणि मॅनेजर यांच्यासह दोन्ही बांग्लादेशी महिलांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात येईल. देवळा पोलिसांच्या कारवाईत मोठं बांग्लादेशी रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. अटकेत असलेल्या महिलांना सोमवारी कळवण न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांनी अवैध, घुसखोरीच्या मार्गाने भारताच्या हद्दीत प्रवेश केल्याच समोर आलं. त्यांच्याजवळ पोलिसांना कुठलीही वैध, प्रवासी कागदपत्र आढळून आली नाहीत. हॉटेल मॅनेजर दीपक ठाकरेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
