AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gaja Marne : पुण्याचा गुंड गजा मारणेची ढाब्यावर पोलिसांसह ‘मटण पार्टी’, काय कारवाई केली त्या पोलिसांवर?

Gaja Marne : पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील एका ढाब्यावर ‘मटन पार्टी’ आयोजित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आश्चर्य व्यक्त केले आहे.

Gaja Marne : पुण्याचा गुंड गजा मारणेची ढाब्यावर पोलिसांसह ‘मटण पार्टी’, काय कारवाई केली त्या पोलिसांवर?
Gaja Marne
| Updated on: May 14, 2025 | 1:45 PM
Share

येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना गुंड गजा मारणे याने ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याची माहिती उघडकीस आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश दिला. मारणेला कारागृहात नेत असताना त्याच्याबरोबर मोटारीचा ताफा होता. त्याला ढाब्यावर भेटणाऱ्या सराइतासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोथरूडमध्ये दुचाकीस्वाराला मारहाण केल्याच्या प्रकरणात मारणे आणि साथीदार येरवडा कारागृहात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मारणेला सांगली येथील कारागृहात नेण्यात येत होते. त्या वेळी पोलीस बंदोबस्तावर सहायक पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी होते.

वाटेत एका ढाब्यावर मारणेची व्हॅन थांबविण्यात आली. बंदोबस्तात असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्याबरोबर ढाब्यावर जेवण केले. मारणेच्या व्हॅनबरोबर असलेल्या मोटारीतील साथीदारांनी मारणेला बिर्याणी नेऊन दिली. मारणेला तेथे सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते हे भेटले. विशाल धुमाळ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपला.

सहा जणांना निलंबित करण्याचा आदेश

मारणेच्या मटण पार्टीची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांनी चौकशी केली. चौकशीत दोषी आढळलेल्या सहायक निरीक्षकासह सहा जणांना निलंबित करण्याचा आदेश त्यांनी दिला.

‘मस्त मटण पार्टी झोडली’

पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील एका ढाब्यावर ‘मटन पार्टी’ आयोजित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आश्चर्य व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, “मोक्का कारवाई अंतर्गत शिक्षा भोगणारा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात शिफ्ट करताना मारणे आणि पोलिसांनी मस्त मटण पार्टी झोडली अशा बातम्या आहेत”

‘कायमस्वरूपी निलंबित करा’

माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, या प्रकरणी निलंबित केलेल्या पोलिसांना नुसते निलंबित करून चालणार नाही तर त्यांना कायमस्वरूपी निलंबित केले पाहिजे. त्याशिवाय गजा मारणेने असे आणखी काही लोक पाळून ठेवले आहे का? याचाही तपास केला पाहिजे. नाहीतर कळायचं की मारणेसाठी त्याच्या जवळच्या लोकांनी सांगली कारागृहात अलिशान रुम विथ झकुझी दिला आहे.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.