
अत्यंत थंडपणे, क्रूरपणे सायको किलर पूनमने (Psycho Killer) तिच्या मुलासह चार जणांना यमसदनी पाठवलं. हरियाणाच्या सोनीपतमधल्या या सायको किलरचे एकेक कारनामे ऐकून हादरायलाच होतं. शुभम, इशाता, जिया आणि विधी या चिमुकल्यांचा तिने जीव घेतला, त्याचेएकेक तपशील समोर येत आहेत. विधीच्या मृत्यूनंतर पूनमचं क्रूर कृत्य आणि आत्तापर्यंत केलेले गुन्हे उघड झाले. पूनमने आधीच तिच्या मोठ्या मुलाला, शुभमला मारलं होते. त्यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता पूनम तुरूंगात गेल्यामुळे त्या मुलाची काळजी राखी ही महिला घेते. ही तीच राखी आहे, जिच्या मुलीची याच पूनमने निर्घृणपणे हत्या केली होती. तिला पाण्यात बुडवून मारलं होतं.
एका बाजूला द्वेष आणि मत्सरातून निष्पाप मुलांना मारणारी सायको किलर पूनम आहे आणि दुसऱ्या बाजूला राखी आहे, जिची सहा वर्षांची मुलगी विधीची पूनमने निर्घृण हत्या केली. पण तरीही ती तिच्या मुलीच्या खुनीच्या मुलाला मिठी मारत आहे आणि त्याला दूध पाजून त्याची काळजी घेत आहे. पूनमच्या सासरच्या मंडळींच्या म्हणण्यानुसार, तिचा मुलगा त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. पूनमने जो गुन्हा केला, त्यात त्या मुलाचा तर काहीच दोष नाही ना. त्याला वाढवण्याची जबाबदारी कुटुंबाची आहे आणि ते त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत असं तिच्या घरच्यांनी सांगितलं.
राखीच्या लेकीला टबमध्ये बुडवून मारलं
30 नोव्हेंबरला लग्नासाठी जेव्हा पूनम गावी आली त्यानंतर तिचा पर्दाफाश झाला. 1 डिसेंबर रोजी दुपारी लग्नाची वरात निघाल्यानंतर, पूनमने बाथरूममधील पाण्याचा टब स्टोअररूममध्ये हलवण्यास मदत करण्यासाठी विधीला बोलावलं. पण ती तिथे पोहोचल्यावर क्रूर पूनमने विधीला त्याच टबमध्ये बुडवून ठारं केलं. विधीच्या मृत्यूनंतर, पोलिस जेव्हा प्रकरणाचा तपास करण्यासाठी आले तेव्हा धक्कादायक खुलासा झाला की, पूनमनेचे विधीची हत्या केली होती.
Psycho Killer : लग्नाआधी ती… सायको किलर पूनमबद्दल आईचा मोठा खुलासा
त्यानंतर पोलिसांनी कठोरपणे पूनमची चौकशी केली असता तिने सगळेच गुन्हे कबूल केले. आपण फक्त विधीलाच मारलं नाही तर याआधी आणखी 3 मुलांनाही संपवल्याचं तिने सांगितलं. एवढंच नव्हे तर विधीला मारल्यानंतर ती आणखी मुलांना मारण्याचाही कट रचत होती, पण तो प्रत्यक्षात येण्यापूर्वीच तिचे गुन्हे उघड झाले. पूनमने यापूर्वीही दोनदा विधीला मारण्याचा प्रयत्न केला होता असंही नंतर तपासात उघड झालं.
2 केला मारण्याचा प्रयत्न
विधीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची लेक जेव्हा 2 वर्षांची होती, तेव्हा पूनमने विधीच्या डोळ्यात पेन्सिल मारून रक्त काढलं. ती खेळता खेलता जखमी झाली, असं कारण पूनमने तेव्हा दिलं. त्यानंतर पूनमने एकदा विधीवर गरम चहाही सांडला होता, पण हेही चुकून झाल्याचं सांगत तिने तिच्या कृत्यांवर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने हे सगळं मुद्दामच केलं असावं असा संशय आता घरच्यांना आहे.