AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात, अवघ्या 15 वर्षांच्या मुलाने टँकर चालवत अनेकांना दिली धडक

पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोघांना चिरडल्याच्या घटनेवरून सुरू असलेला गदारोळ अद्यापही शमलेला नाही. या भीषण अपघाताच्या स्मृती ताज्या असतानाच पुण्यात पुन्हा असाच एक अपघात घडला असून त्यासाठीही एक अल्पवयीन मुलगा जबाबदार आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना टँकरने चिरडलं

Pune Crime : पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात, अवघ्या 15 वर्षांच्या मुलाने टँकर चालवत अनेकांना दिली धडक
| Updated on: Jun 29, 2024 | 8:43 AM
Share

पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोघांना चिरडल्याच्या घटनेवरून सुरू असलेला गदारोळ अद्यापही शमलेला नाही. या भीषण अपघाताच्या स्मृती ताज्या असतानाच पुण्यात पुन्हा असाच एक अपघात घडला असून त्यासाठीही एक अल्पवयीन मुलगा जबाबदार आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना एका टँकरने चिरडलं. पुण्यातील वानवडी येथे हा भीषण अपघात घडला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा टँकर अवघा 15वर्षांचा मुलगा चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत काही मुलं जखमी झाली असून एक दुचाकीवरील महिलादेखील जखमी झाली आहे. आज (शनिवार) सकाळी 6.30 च्या सुमारास हा अपघात घडल्याचं समजतं.

या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून चालकाला पकडून ठेवले आहे. अतशिय अवजड टँकर अवघ्या 15वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  सैफ पठाण असे या टँकर चालकाचे नाव असून तो अवघ्या 15  वर्षांचा आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच याप्रकरणाच्या अधिक तपासासाठी पोलिसांनी तो टँकरही ताब्यात घेतला आहे. या टँकरचा मूळ मालक, महिंद्रा बोराटे याला देखील पोलीस चौकशीसाठी बोलावणार आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असूनअधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी हे दुचाकीवरून जात होते. तर त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या काही मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढले. अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?