AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : पुण्यातील जर्मन महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपीला अखेर एक चावा, जन्मठेपेकडे असा घेऊन गेला

Pune crime : अशा पोलीस अधिकाऱ्यांना सलाम, वर्ष गेली पण न्यायालयात पाठ पुरावा सुरुच ठेवला, अखेर जर्मन महिलेच्या हत्येप्रकरणी एक चावा असा मोठा पुरावा ठरला.

Pune crime : पुण्यातील जर्मन महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपीला अखेर एक चावा, जन्मठेपेकडे असा घेऊन गेला
Pune murder german women Gudrun CorvinusImage Credit source: Maharashtra Vishwakosh
| Updated on: Jun 11, 2023 | 11:04 AM
Share

पुणे : पुण्यात काही वर्षांपूर्वी पुरातत्त्व विषयाशी संबंधित काम करणाऱ्या एका जर्मन महिलेची निर्घृपणे हत्या झाली होती. इथोपिया ते दक्षिण आफ्रिका आणि फ्रान्स असे देश या महिलेने पालथे घातले होते. त्यानंतर सन 1961 मध्ये ही महिला पुण्यात आली. गडरन कॉरविनस असं या महिलेचं नाव होतं. पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन कॉलेजशी ती जोडली गेली. पुण्यातीलच एका शास्त्रज्ञाशी तिने लग्न केलं. काही वर्षानंतर दोघे विभक्त झाले.

गडरन कॉरविनस पुण्यातील हाय प्रोफाइल कोरेगाव पार्कमध्ये भागामध्ये राहत होत्या. 2006 साली एका रिअल इस्टेट एजंटने त्यांची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात पुणे पोलिसांनी जो तपास केला, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. पुणे पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे एका जर्मन महिलेच्या हत्या प्रकरणात आरोपीला जन्मठेप झाली.

पोलिसांनी फ्लॅट उघडला, तेव्हा काळाजाच थरकाप उडवणार दुश्य

पोलीस रेकॉर्डनुसार, गडरन यांच्या लिबर्टी सोसायटीमध्ये दोन फ्लॅट होते. त्या एकट्या तिथे रहायच्या. त्यांना एक फ्लॅट विकायचा होता. फ्लॅट विक्रीसाठी त्यांनी काही रिअल इस्टेट एजंटशी संपर्क साधला होता. पोलिसांना सर्वप्रथम या प्रकरणाबद्दल गडरन यांचे मित्र डॉ. फारुख वाडिया यांच्याकडून कळलं होतं. 30 डिसेंबर 2005 पासून गडरन माझ्या फोन कॉल्सला प्रतिसाद देत नाहीय, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. 7 जानेवारी 2006 रोजी पोलिसांनी गडरन यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला, त्यावेळी समोरच दृश्य बघून काळाजाचा थरकाप उडाला होता. समोर शिरच्छेद झालेला मृतदेह होता.

रक्ताचे डाग असलेला 20 लाखाच चेक

फ्लॅटमधील टेलिफोनची वायर कापण्यात आली होती. रक्ताचे डाग असलेला 20 लाखाच एक चेक पोलिसांच्या हाती लागला होता. काही दिवसांनी मुंढवा-खारादी ब्रिजजवळ पोलिसांना गडरन यांचं मुंडक सापडलं. गडरन यांनी ज्या रिअल इस्टेट एजंट्सशी संपर्क साधला होता, त्या दिशेने पोलिसांनी आपला तपास केंद्रीत केला.

इखलाकच्या हातावर एक निशाण

पोलिसांनी नवीन मंगळवार पेठ येथे राहणाऱ्या इखलाक फकीर मोहम्मद शेख याला ताब्यात घेतलं. तो डिसेंबर 2005 मध्ये गडरन यांच्या घरी गेला होता. इखलाकच्या हातावर एक निशाण होतं. कोणीतरी त्याचा चावा घेतल्याच ते निशाण होतं. इखलाक पोलिसांना हातावरच्या त्या निशाणीबद्दल सांगू शकला नाही. त्याच वर्तन संशयास्पद होतं.

मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे करण्याचा त्याचा प्लान

पोलिसांना आरोपीकडे गडरन यांच्या फ्लॅटच्या चाव्यांचा गुच्छ सापडला. गडरन यांच्या घरातील काही वस्तूही आरोपीकडे होत्या. 1 जानेवारी 2006 रोजी इखलाक गडरन यांच्या घरी गेला होता. फ्लॅटच्या डीलची बोलणी करण्यासाठी तो गेला होता. त्यावेळी आरोपीने धारदार शस्त्राने गडरन यांचा गळा कापला. गडरन यांची हत्या केल्यानंतर त्यांचं मुंडक पिशवीत टाकलं व मुंढवा-खारादी ब्रिजवर टाकून दिलं. पुरावे मिटवण्यासाठी मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे करण्याचा त्याचा प्लान होता. 6 वर्षाच्या शोधानंतर पुन्हा अटक

गडरन यांचा फ्लॅट बळकावण्याचा आरोपीचा इरादा होता. 8 जानेवारी 2008 रोजी त्याला अटक झाली. आरोपीच्या हातावर असलेलं चाव्याच निशाण कोर्टात महत्वाचा पुरावा ठरलं. जानेवारी 2009 मध्ये पुणे सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 28 मे 2009 रोजी इखलाक 14 दिवसांच्या पॅरोलवर येरवडा जेलमधून बाहेर आला. हा पॅरोल आणखी 15 दिवसांसाठी वाढवण्यात आला. 26 जूनला त्याने कारागृहात परतणे अपेक्षित होते. पण तो फरार झाला. अखेर 2015 साली पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.