पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असताना पुण्यात एका बनावट IASचा धुमाकूळ, लोकांना पैसे व्याजाने देत…

IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असताना पुण्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. आयएएस अधिकारी असल्याचं सांगत एका तरूणाने महिलांना व्याजाने पैसे देत त्यांच्याकडून जास्तीचे पैसे उकळत त्यांनाच धमकी दिलीये. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.

पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असताना पुण्यात एका बनावट IASचा धुमाकूळ, लोकांना पैसे व्याजाने देत...
Follow us
| Updated on: Jul 27, 2024 | 6:42 PM

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवलं असून UPSC ने त्यांच्याविरूद्ध FIR दाखल केलाय. पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांनी खोटा घटस्फोट घेतल्याची चर्चा आहे. वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर चर्चेत असताना पुण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पुण्यात एक बनावट आयएएस तरूणी धूमाकूळ घालत असून महिलांची फसवणूक करत त्यांच्याकडून पैसे उकळत होती.

पुण्यातील लोणी काळभोर परिसराती ही घटना आहे. या परिसरामध्ये एक बनावट आयएएस अधिकारी महिलांना व्याजाने पैसे देत त्यांची फसवणूक करत होती. रेणुका ईश्वर करनुरे असं या बनावट आयएएस महिला अधिकारीचं नाव आहे. पुण्यामधील वडकी परिसरामध्ये राहणाऱ्या रेणुकाने अनेक महिलांना दर महिन्याला दहा रूपये टक्क्याने पैसे उकळले. हे प्रकरण एका पीडित महिलेने पोलीस तक्रार केल्यावर समोर आलंय.

बनावट आएएस अधिकारी रेणुकाने पीडित महिलेला दोन लाख 68 हजार रुपये व्याजाने दिले होते. या बदल्यात पीडितेने रेणुकाला आतापर्यंत तीन लाख 48 हजार रुपये दिले असताना सुद्धा बनावट आयएस अधिकारी रेणुकाने आणखीन चार लाख 55 हजार रुपयाची मागणी केली. मी आय एस अधिकारी आहे माझ्या नादाला लागू नको तुला कामाला लावेल, माझे पैसे तू ताबडतोब दे, अशी धमकी रेणूकाने पीडित महिलेला दिली.

दरम्यान, या त्रासाला वैतागून पीडित महिलेने लोणी काळभोर पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी आता बनावट आयएस अधिकारी रेणुका ईश्वर करनुरे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रेणुकाची अनेक प्रकरणे आता समोर येत आहेत.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.