AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठवीत शिकणाऱ्या मुलानं प्रपोज केला म्हणून तिने आईला सांगितलं! आईने काय केलं?

मोबाईलमधून फोटो काढले, कोलाज बनवला आणि व्हॉट्सअपवर पाठवून प्रपोज! घटना पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील

आठवीत शिकणाऱ्या मुलानं प्रपोज केला म्हणून तिने आईला सांगितलं! आईने काय केलं?
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 24, 2022 | 9:50 AM
Share

पुणे : एका अल्पवयीन मुलानं अल्पवयीन मुलीला प्रपोज केल्याची घटना उघडकीस आलीय. हडपसर पोलीस स्थानकात याप्रकरणी मुलीच्या आईने प्रपोज करणाऱ्या मुलाविरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलीय. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्यासोबत शिकणाऱ्या मुलीला मागणी घातली. पण मुलीने नकार दिल्यानं हा मुलगा अल्पवयीन मुलीला धमक्याही देऊ लागला होता. अखेर मुलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. आता पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 13 वर्षाची आहेत. तर तिला प्रपोज करणाऱ्या मुलाचं वय 14 वर्ष आहे. ते दोघंही जण आठवीत एकाच शाळेत शिकतात. प्रपोज करणारा गेले काही दिवस मुलीचा पाठलाग करत होता, असा आरोप करण्यात आला आहे.

याआधीही आठवीत शिकणाऱ्या मुलाने पीडितेला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने तिचा लपून मोबाईलमधून फोटो काढला. यावेळी काढलेल्या फोटोंचा त्याने कोलाज बनवला आणि मुलीच्या व्हॉट्सअपवर पाठवून तिला प्रपोज केलं.

पण मुलीनं त्याला नकरा दिला. शिवाय या सगळ्या प्रकाराला विरोध केला. त्यानंतर मुलीने आठवीत शिकणाऱ्या या मुलीला धमकीही दिली. अखेर घाबरलेल्या मुलीने आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार आईला सांगितलं. त्यानंतर आईने पोलिसांत रितसर तक्रार दिली.

हडपसर पोलीस स्थानकातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांनी केलेल्या आरोपांनुसार याप्रकरणाची नोंद घेण्यात आली आहे. मात्र सध्या परीक्षांचा काळ सुरु असल्यानं परीक्षा झाल्या या मुलाची चौकशी केली जाणार आहे. शिवाय या मुलाला ताब्यात घेत बाल कल्याण समितीसमोरही आणलं जाण्याची शक्यता आहे. शिवाय या मुलाच्या कुटुंबियांना एक नोटीसही पोलिसांनी पाठवल्याची माहिती समोर आलीय.

ही घटना 17 नोव्हेंबर रोजी घडली होती. तर पोलीस तक्रार 21 नोव्हेंबर रोजी देण्यात आली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. आता या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीची चौकशी केली. त्यानंतर आता मुलाचीही लवकरच चौकशी केली जाणार आहे.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....