पोलिसांच्या नावाने लाच मागितली, काँग्रेस आमदाराचा नातेवाईक अटकेत; पुण्यात खळबळ

पुण्यात दोन आरोपीेना लाच मागताना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी पोलिसांच्या नावाने लाच मागितल्याचं लाचलूचपत विभागाने सांगितलं. यातील एकजण आमदाराचा नातेवाईक असल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या नावाने लाच मागितली, काँग्रेस आमदाराचा नातेवाईक अटकेत; पुण्यात खळबळ
दुकानाचे शटर तोडून मोबाईलची चोरी
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 7:38 AM

पुणे : राज्यात गुन्ह्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. गुन्हे करणाऱ्या आरोपींना पोलीस तात्काळ अटक करून त्यांची रवानगी तुरुंगातही करत असतात. यातील काही गुन्हेगार नवखे असतात तर काही सराईत असतात. त्यामुळे पोलीस गुन्हा आणि गुन्हेगारांची पार्श्वभूमी पाहूनच कारवाई करत असतात. पण पुण्यात एक वेगळाच आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. थेट पोलिसांच्या नावानेच लाच मागितल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना घडल्यानंतर लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना अटक केली. पण त्यात चक्क काँग्रेसच्या आमदाराचा नातेवाईकच आढळून आल्याने यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे. आता या प्रकरणाचा लाचलूचपत विभागाकडून सखोल तपास केला जात आहे.

पोलिसांच्या नावाने 3 लाखांची मागणी करणाऱ्या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून धक्कादायक म्हणजे तीन लाखांची मागणी करणारे पुरंदरचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. अक्षय सुभाष मारणे आणि गणेश बबनराव जगताप (रा .सासवड, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांची लाचलूचपत विभागाकडून कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा

तीन लाखांची मागणी

तक्रारदाराने सासवड पोलिसात अर्ज केला होता. त्या अर्जावरून सासवड पोलीस स्टेशननचे पोलीस निरीक्षक घोलप यांच्या करीता तीन लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच या मागणीमध्ये गणेश जगताप नावाच्या व्यक्तीने देखील मदत केल्याचे समोर आले आहे. यावरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आले आहे.

चर्चांना उधाण

अटक केल्यापैकी एकजण आमदार संजय जगताप यांचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संजय जगताप यांचा या घटनेशी काही संबंध तर नाही ना अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. याशिवाय अक्षय मारणे आणि गणेश जगताप हे आणखी राजकीय नेत्यांची कामे करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे राजकारणी कोण आहेत? त्यांच्यासाठी या आरोपींनी लाच मागितली का? आतापर्यंत किती वेळा लाच मागितली? कुणाकुणाला फसवलं? याची माहिती लाचलूचपत विभागाकडून घेतली जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.