चाकणमध्ये ‘दृश्यम’ सिनेमासारखं हत्याकांड! पण ती एक चूक आरोपीला महागात पडली

पत्नीच्या हत्येप्रकरणी चाकण पोलिसांनी हत्येप्रकरणी पतीला अटक केलीच, पण तिच्या सासऱ्यांसह पतीच्या तिघा मित्रांनाही का बेड्या ठोकल्या?

चाकणमध्ये 'दृश्यम' सिनेमासारखं हत्याकांड! पण ती एक चूक आरोपीला महागात पडली
धक्कादायक हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 10, 2022 | 11:31 AM

सुनिल थिगळे, TV9 मराठी, पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी (Chakan Crime News) परिसरात एक खळबळजनक हत्याकांड घडलं. एका पतीने पत्नीची हत्या (Husband Killed wife) केली. राहत्या घरात पत्नीचा खून केल्यानंतर पतीने दृश्यम सिनेमाप्रमाणे (Drishyam Movie Murder Mystery) पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट आखला. पण एक चूक पतीला भारी पडली.

मारेकरी पतीने केलेल्या एका चुकीमुळे या खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं. या हत्येप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केलीय. चाकण पोलीस आता आरोपीची कसून चौकशी करत आहेत. कुटुंबीयांच्या मदतीनेच आरोपीने हे कृत्य केलं होतं.

हत्येचा कट, पण एक चूक…

चाकण एमआयडीसी परिसरात देशमुख कुटुंबीय नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आलं होतं. आशा देखमुखचा पती गोरक्षनाथ याला पत्नीवर संशय होता. पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध आहे, असा गोरक्षनाथ देशमुख याला संशय होता. याच संशयातून त्याने पत्नीची हत्या केली होती. कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने राहत्या घरातच त्याने आशाचा जीव घेतला.

हे सुद्धा वाचा

घरात गळफास देऊन गोरक्षनाथने आशाची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाची वाट लावण्यासाठी तो आळंदीफाटा येथील डोंगरावर तिचा मृतदेह घेऊन गेला. तिथे त्याने जमिनीत आशाचा मृतदेह पुरला. इथपर्यंत त्याने हत्येचा आखलेला प्लान नीट झाला. पण यानंतर गोरक्षनाथने हत्येचा आळ येऊ नये, यासाठी केलेली कृती त्याला गजाआड घेऊन गेली.

नेमकं काय केलं?

आशाची हत्या करुन गोरक्षनाथने मृतदेह डोंगरावर नेऊन पुरला खरा! पण पत्नीच्या हत्येचा सुगावा कुणाला लागू नये, यासाठी तो स्वतःच पोलीस स्थानकात गेला. त्याने चाकण पोलीस स्थानक गाठलं आणि पोलिसांकडे पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनीही तपास सुरु केला.

पोलिसांनी केलेल्या तपासातून संशयाचे अनेक ढग हे गोरक्षनाथ देशमुख यांच्याभोवती दाटले. अखेर पोलिसांनी गोरक्षनाथची कसून चौकशी केली. त्यानंतर आशाचे सासरे यांच्यासह गोरक्षनाथच्या काही मित्रांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. एकूण चार जणांना पोलिसांनी आशाच्या हत्येप्रकरणी आणि तिचा मृतदेह पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली.

गोरक्षनाथ देशमुख, बबन देशमुख, रोशन भागात, देवानंद मनवर अशी अटक केलेल्या चौघा आरोपींची नावं आहेत. आता अटक करण्यात आलेल्या सर्वांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय. चाकण एमआयडीसी परिसरात या घटनेनंतर एकच खळबळ उडालीय.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.