AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदापूरमध्ये शिक्षकच विद्यार्थ्यांसमोर एकमेकांना भिडले, संतप्त पालकांकडून बदलीची मागणी

या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या शिक्षकांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नवीन शिक्षक येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

इंदापूरमध्ये शिक्षकच विद्यार्थ्यांसमोर एकमेकांना भिडले, संतप्त पालकांकडून बदलीची मागणी
इंदापूरमध्ये शिक्षकांमध्ये वादImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Dec 17, 2022 | 3:38 PM
Share

इंदापूर : शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर आणि इथले शिक्षक विद्यार्थी आणि समाज घडवत असतात. घरात आईवडील तर शाळेत शिक्षक मुलांवर संस्कार करत असतात. पण याच ज्ञानाच्या मंदिरात शिक्षिकांनीच विद्यार्थ्यांसमोर धक्कादायक कृत्य केलं आहे. इंदापूर तालुक्यातील चाकाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपापसात हाणामारी केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

पालकांमध्ये संतापाचे वातावरण

या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या शिक्षकांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नवीन शिक्षक येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

चाकाटीच्या जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना

सुभाष भिटे, उद्धव गरगडे आणि संजीवनी गरगडे अशी भांडणे करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत. भिटे आणि संजीवनी गरगडे हे चाकाटीच्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. संजीवनी गरगडे यांचे पती उद्धव गरगडे हे लाखेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

दोन शिक्षकांमध्ये आधी वाद झाला होता

शुक्रवारी भिटे आणि संजीवनी गरगडे यांच्यात आधी वाद झाला होता. त्यानंतर शाळा सुटताना उद्धव गरगडे आल्यानंतर दोघांविरुध्द एक अशी धुमश्चक्री सुरु झाली.

घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसमोरच हा प्रकार घडला, बघे ही जमले. त्यांनी या हाणामारीचे फोटो काढले. मोबाईलवर चित्रण केले. ते वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. या प्रकारानंतर पालक स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी निवेदन तयार केले आणि त्यावर इतर पालकांच्या सह्या घेतल्या. यानंतर गट शिक्षण अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले.

पालकांकडून शिक्षकांच्या बदलीची मागणी

या शिक्षकांमध्ये वारंवार वादविवाद होतात. हाणामारी होते. त्यामुळे पाल्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. पाल्यांना शाळेच्या अभ्यासक्रमातील काहीही येत नाही. त्यामुळे या दोन्ही शिक्षकांची तातडीने बदली करण्यात यावी.

नवीन शिक्षक येईपर्यंत आम्ही सर्व जण शाळा बंद करीत आहोत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाखाली 35 पालकांच्या सह्या आहेत. अशा गंभीर कृत्याकडे अधिकारी वर्ग काय शिक्षा करणार याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.