Pune Crime : पुण्यात मध्यरात्री रक्तरंजित खेळ, जुन्या वादातून तरुणाला चित्रपटगृहाबाहेरच संपवले !

पुण्यात गुन्हेगारी सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. भररस्त्यात हल्ले, मारामारीच्या घटना सर्रासपणे घडत आहेत. अशीच एक घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री रक्तरंजित खेळ, जुन्या वादातून तरुणाला चित्रपटगृहाबाहेरच संपवले !
पुण्यात जुन्या वादातून तरुणावर हल्ला
| Edited By: | Updated on: Aug 16, 2023 | 10:51 AM

पुणे / 16 ऑगस्ट 2023 : जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला त्याला संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. नितीन म्हस्के असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. भररस्त्यात खुलेआम गुन्हेगार बिनधास्त गुन्हे करताना दिसत आहे. यावरुन गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे चित्र आहे. पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे.

जुन्या वादातून टोळक्याने तरुणाला संपवले

मयत नितीन याचा आरोपी टोळक्यासोबत जुना वाद होता. याच वादातून टोळक्याने त्याचा काटा काढला. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात चित्रपटगृहाच्या बाहेर मध्यरात्री 1 वाजता ही घटना घडली. नितीन हा चित्रपटगृहात चित्रपट पहायला आला होता. चित्रपट संपल्यानंतर बाहेर येताच 10 ते 12 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर तलवार, लोखंडी गज, काठ्या डोक्यात घालून नितीनवर प्राणघातक हल्ला केला. यात नितीनचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी फरार झाले आहेत.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

घटनेची माहिती मिळतात शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींच्या अटकेनंतरच त्यांच्यात नेमका वाद होता हे कळेल.