Pune news : सुट्टीनिमित्त औंधहून भोरला कुटुंबासह पिकनिकला गेले, धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पोहण्याचा मोह झाला अन्…

सुट्टीचा आनंद घेण्यासाठी एक कुटुंब अन्य नातेवाईकांसह भोर तालुक्यात रिसॉर्टवर आले होते. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. मजा करत असताना जे घडलं त्याने कुटुंबावर शोककला पसरली.

Pune news : सुट्टीनिमित्त औंधहून भोरला कुटुंबासह पिकनिकला गेले, धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पोहण्याचा मोह झाला अन्...
भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पोहायला गेलेले बापलेक बुडालेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 10:06 AM

पुणे / 16 ऑगस्ट 2023 : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील रिसॉर्टवर एक कुटुंब पर्यटनासाठी आले होते. मात्र पिकनिकचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बॅक वॉटरमध्ये पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या बाप-लेकीचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. मुलीला उपस्थितांनी तात्काळ पाण्याबाहेर काढले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वडिलांचा मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहिम राबवूनही मृतदेह सापडला नव्हता. रात्री अंधार झाल्याने शोधमोहिम थांबवण्यात आली होती. मात्र सकाळी वडिलांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. शिरीष मनोहर धर्माधिकारी आणि ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी अशी बुडालेल्या बापलेकीची नावं आहेत.

धरण पहायला गेले होते सर्वजण

मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी असल्याने औंध येथील शिरीष धर्माधिकारी कुटुंबासह भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात असणाऱ्या रिसॉर्टवर पर्यटनासाठी आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे अन्य काही नातेवाईकही होते. हे सर्वजण दुपारी 4 च्या सुमारास सिमा फार्म रिसॉर्टच्या पाठीमागे असणाऱ्या भाटघर धरणाचे पाणी पाहण्यासाठी गेले. यावेळी शिरीष हे बेबी पूल पाहण्यासाठी गेले. त्यानंतर मुलगी ऐश्वर्या हिला देखील त्यांनी बोलावून घेतले.

बाप-लेक पोहायला गेले अन् बुडाले

दरम्यान, दोघेही खोल पाण्यात पोहत असताना अचानक बुडाले. यावेळी उपस्थित काहींनी या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ऐश्वर्याला पाण्याबाहेर काढले तेव्हा ती बेशुध्द पडलेली होती. त्यानंतर तिला सरकारी दवाखाना भोर येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. तर शिरीष धर्माधिकारी हे पाण्यात बुडाले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरु होता. मात्र रात्री अंधार पडल्यानं हे शोधकार्य थांबविण्यात आलं. आज सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगातना आढळून आला आहे. घटनेचा अधिक तपास भोर पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा

धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?.
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?.